वस्तुस्थिती न पाहता बदनामीचा केविलवाणा प्रयत्न; रॅपिडोच्या स्पॉन्सरशीपवरून सरनाईंकाचा रोहित पवारांना टोला

वस्तुस्थिती न पाहता बदनामीचा केविलवाणा प्रयत्न; रॅपिडोच्या स्पॉन्सरशीपवरून सरनाईंकाचा रोहित पवारांना टोला

Shameless attempt to defame without looking at facts Sarnaik hits Rohit Pawar over Rapido sponsorship : गेल्या काही दिवसांपुर्वी रॅपिडो कंपनीच्या तक्रारी आल्या होत्या. त्यावर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून कारवाई देखील करण्यात आली. मात्र आता या रॅपिडोने थेट सरनाईक यांच्या फॉंडेशनला स्पॉन्सरशीप दिली आहे. त्यामुळे ही कारवाई म्हणजे स्पॉन्सरशीपसाठी ब्लॅकमेलिंग होतं का? अशी टीका रोहित पवार यांनी केली आहे. त्याला आता प्रताप सरनाईक यांच्याकडून खुलासा करत उत्तर दिले आहे.

काय म्हणाले प्रताप सरनाईक?

कोणताही खेळ हा खेळचं असतो. त्यात राजकारण आणणे योग्य नाही. पुर्वेश प्रताप सरनाईक हे गेली 3 वर्ष प्रो- गोविंदा लीग ही महाराष्ट्रीयन संस्कृती ची शान असलेल्या साहसी खेळांची स्पर्धा भरवत आहेत. यंदा 26 मे पासून हि स्पर्धा सुरू झाली त्यावेळी या स्पर्धेसाठी ज्या 20-25 पुरस्कृत संस्था आहेत. त्यापैकी रॅपिडो हि देखील एक पुरस्कृत संस्था आहे. ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही.

मतांची चोरी नाही, त्यांच्या डोक्यातील चिप अन् हार्ड डिस्क करप्ट; फडणवीसांचा राहुल गांधींना टोला

आपल्या मुलाच्या एका कार्यक्रमाला पुरस्कृत करणाऱ्या रॅपीडो या संस्थेच्या अनाधिकृत ॲप सेवेबद्दल पावसाळी अधिवेशनात लोकप्रतिनिधी शंका उपस्थित केल्यानंतर तातडीने कर्तव्यध्यक्ष मंत्री म्हणून प्रताप सरनाईक यांनी या संस्थेवर कारवाई केली आहे. हि कारवाई केवळ एका चालकावर केली नसून त्या संस्थेच्या उच्च पदस्थ अधिकाऱ्यांच्या वर केलेली आहे. त्यामुळे संबंधित संस्था कोणाला पुरस्कृत करते. याची कोणतीही भीड न बाळगता नि:पक्ष पणे त्या संस्थेच्या चुकीच्या वर्तनाबद्दल कारवाई करण्याचा धाडस मंत्री म्हणून प्रताप सरनाईक यांनी दाखवला आहे.

विशेष म्हणजे एवढा मोठा संस्थेवर अशा प्रकारे कडक कारवाई करणारे पहिले परिवहन मंत्री हे प्रताप सरनाईक आहेत. खरतर या बाबीचे कौतुक करणे अपेक्षित आहे. परंतु विरोधाला विरोध करायचा म्हणून काही व्यक्तींनी वस्तुस्थिती काय आहे, हे न पाहता चुकीच्या पद्धतीने परिवहन मंत्री श्री. प्रताप सरनाईक यांना बदनाम करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे. तो अत्यंत घृणास्पद आहे.

शरद पवारांना धक्का , आगामी निवडणुकांपूर्वी ‘हा’ बडा नेता काँग्रेसमध्ये

26 मे 2025 रोजी स्पर्धा सुरू झाल्यापासून रॅपिडो ही संस्था प्रो- गोविंदा लीगसोबत अधिकृतरित्या संलग्न होती. त्यानंतर, दिनांक २ जुलै 2025 रोजीच परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी संबंधित प्रकरणी आवश्यक ती कायदेशीर कारवाई केली होती. एवढंच नाही तर मंत्री सरनाईक यांच्या निर्देशानुसार परिवहन विभागाने दि.17 व 18 जुलै रोजी रॅपिडो संस्थेच्या उच्च पदस्थ अधिकाऱ्यांवर कलम बी. एन. एस.एस.१७३ च्या अंतर्गत आंबोली पोलीस स्थानक मुंबई, येथे रितसर FIR नोंदवला आहे.

परराष्ट्र धोरण विदेश दौरे काढण्यापुरतेच आहे का?, 25 टक्के टॅरिफवरून ठाकरेंचा मोदी सरकारला सवाल..

त्यामुळे, कृपया #ProGovinda या खेळाला राजकारणाशी जोडू नका. असे आवाहन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले आहे. उलट दहीहंडी हा पारंपरिक खेळ आता “Pro Govinda” मुळे मॅटवर आणि सुरक्षिततेत खेळला जातो, ही आपल्या महाराष्ट्रासाठी आनंदाची बाब आहे.असे प्रतिपादन मंत्री सरनाईक यांनी केले आहे.

काय म्हणाले होते रोहित पवार?

शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी एक्स या सोशल मिडीयाच्या माध्यमातून परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यावर टीका करताना म्हटले आहे की, परिवहन मंत्र्यांचा #डबल_धमाका. रॅपिडो बाईक आली. त्याला खुद्द मंत्र्यांनी अडवून कारवाई केली.बातम्या झाल्या, प्रसिद्धी मिळाली. मंत्र्यांनी ’रॅपिड’ भूमिका बदलली आणि शेवटी मांडवली होऊन स्पॉन्सरशीप मिळाली. यावरून हे सरकार जनतेसाठी नाही तर स्वतःसाठीच काम करतंय, हे स्पष्ट होतं! पण मला सरकारला विचारायचंय की हा मंत्रीपदाचा गैरवापर तर नाही ना? ब्लॅकमेल_सरकार असं म्हणत त्यांनी टीका केली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube