परराष्ट्र धोरण विदेश दौरे काढण्यापुरतेच आहे का?, 25 टक्के टॅरिफवरून ठाकरेंचा मोदी सरकारला सवाल..

Aditya Thackeray On Modi government : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) हे मागील काही दिवसांपासून अनेक मोठे निर्णय घेत आहेत. भारत (India) रशियाकडून तेल खरेदी करत असल्यामुळे ट्रम्प यांनी दंड म्हणून बुधवारी भारतावर २५ टक्के टॅरिफ कर (Tariff tax) लादलाय. यावरून ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी मोदी सरकारवर (Modi government) जोरदार हल्ला चढवला आहे.
अहिल्यानगरच्या तरूणाकडून अमेरिकेतील महिलेची फसवणूक; क्रिप्टो करन्सीतून 14 कोटींना लुबाडलं
‘तारीफ’पासून ‘टॅरिफ’पर्यंतचा प्रवास आता ५०% पर्यंत पोहोचलाय. पण केंद्र सरकारमधील मंत्री ह्यावर बोलत नाही. आपल्या देशाचं परराष्ट्र धोरण विदेश दौरे काढण्यापुरतेच आहे का?, असा सवाल त्यांनी केला.
• ते म्हणाले की, बांगलादेशमधील हिंदूंवर हल्ले होत आहेत आणि @BCCI नेच बांगलादेशला भारतात द्विपक्षीय क्रिकेट स्पर्धेसाठी आमंत्रित केलं.
• ते म्हणाले की, पहलगाम हल्ल्यामागे पाकिस्तान आहे! जगाला हेच सांगण्यासाठी खासदार जगभर पाठवले आणि आता @BCCI पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळत आहे.…
— Aaditya Thackeray (@AUThackeray) August 7, 2025
आदित्य ठाकरेंनी एक्स अकाऊंटवर एक पोस्ट केली. त्यात त्यांनी लिहिलं की, बांगलादेशमधील हिंदूंवर हल्ले होत आहेत आणि बीसीसीआयनेच बांगलादेशला भारतात द्विपक्षीय क्रिकेट स्पर्धेसाठी आमंत्रित केलं. ते म्हणाले की, पहलगाम हल्ल्यामागे पाकिस्तान आहे! जगाला हेच सांगण्यासाठी खासदार जगभर पाठवले आणि आता बीसीसीआय पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळत आहे. गेल्यावर्षी बीसीसीआय अधिकारी पाकिस्तानी क्रिकेटपटूंसोबत पार्टी करत होते, असं आदित्य ठाकरे म्हणाले.
जैन समाजाला मुंबई HC चा झटका; नागरिकांचे आरोग्य महत्त्वाचे, कबुतरांना अन्न पाणी देता येणार नाही
पुढं आदित्य ठाकरेंनी लिहिलं की, ते म्हणाले, चीनवर बहिष्कार टाका, चिनी वस्तू वापरू नका. चीनला “लाल आँख” दाखवतो असंही त्यांनी म्हटलं. मग आता चीन दौरा कशासाठी? गलवान घडलं की नाही? त्यांनी आपल्या हद्दीत अतिक्रमण केलं की नाही?, असं ते म्हणाले.
ठाकरेंनी लिहिलं की, ते म्हणाले MAGA + MIGA = MEGA. पण ‘तारीफ’पासून ‘टॅरिफ’पर्यंतचा प्रवास आता ५०% पर्यंत पोहोचलाय. भारतीय विद्यार्थ्यांना फटका बसतोय, उद्योग आणि लघुउद्योग अडचणीत आहेत पण केंद्र सरकारमधील कोणताही मंत्री ह्याविषयावर बोलत नाहीय, व्यापार करारावरही कोणतीच स्पष्टता नाहीय. आपल्या देशाचं परराष्ट्र धोरण विदेश दौरे काढण्यापुरतेच आहे का?, असा सवाल आदित्य ठाकरेंनी केला.
दरम्यान, आदित्य ठाकरेंच्या या टीकेला आता मोदी सरकारकडून प्रत्युत्तर दिलं जातं, हेच पाहणं महत्वाचं आहे.