ब्रेकिंग! खासदार सुप्रिया सुळेंनी घेतली PM मोदींची भेट; खास पैठणीचं गिफ्ट, राजकारण तापलं…

ब्रेकिंग! खासदार सुप्रिया सुळेंनी घेतली PM मोदींची भेट; खास पैठणीचं गिफ्ट, राजकारण तापलं…

MP Supriya Sule Meet PM Modi : देशाच्या राजकारणात (Politics) खळबळजनक हालचालींना वेग आलाय. महायुतीचे (Mahayuti) अनेक नेते सध्या दिल्लीमध्ये ठाण मांडून आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत आहेत, तर इंडिया आघाडीचीही महत्वाची बैठक चालू आहे. याच पार्श्वभूमीवर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांची आज अचानक भेट घेतली. यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

मतांची चोरी नाही, त्यांच्या डोक्यातील चिप अन् हार्ड डिस्क करप्ट; फडणवीसांचा राहुल गांधींना टोला

पैठणी आडून संवाद?

राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त सुप्रिया सुळे यांनी महाराष्ट्रातील कुशल विणकरांनी बनवलेली खास पैठणी पंतप्रधान मोदींना भेट दिली. सुळे यांनी याबाबत सोशल मीडियावर लिहिताना, ‘देशाचे प्रधानमंत्री मा. नरेंद्र जी मोदी यांची आज भेट घेतली. यावेळी महाराष्ट्राच्या कुशल विणकरांनी बनवलेली खास पैठणी त्यांना भेट दिली. भेटीसाठी वेळ दिल्याबद्दल त्यांचे मनापासून आभार,’असं नमूद केलं. परंतु ही भेट फक्त हस्तकलेच्या सन्मानापुरती मर्यादित आहे का? की त्यामागे मौन राजकारणाचे धागे विणले जात आहेत? असे सवाल राजकीय वर्तुळात उपस्थित होत आहेत.

शरद पवारांना धक्का , आगामी निवडणुकांपूर्वी ‘हा’ बडा नेता काँग्रेसमध्ये

महत्त्वाच्या वेळेत घेतलेली ‘भेट’

महत्त्वाचं म्हणजे सुप्रिया सुळे दिल्लीमध्ये असतानाच उद्धव ठाकरेदेखील इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी दिल्लीमध्ये पोहोचले आहेत. दुसरीकडे, एकनाथ शिंदे, अजित पवार, देवेंद्र फडणवीस हे महायुतीतील प्रमुख चेहरे दिल्लीमध्ये वेगवेगळ्या बैठकींना सामोरे जात आहेत. अशा तणावपूर्ण राजकीय वातावरणात सुप्रिया सुळे यांची मोदींशी झालेली ही ‘भेट’, राजकीय वर्तुळात वेगळेच प्रश्न निर्माण करतेय.

राजकारणात मोठा भूकंप?

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार विरुद्ध अजित पवार असा उघड संघर्ष आहे. अजित पवार हे सत्तेत सहभागी झाले असले, तरी शरद पवार गट स्वतंत्रपणे विरोधी बाकावर आहे. याच वेळी सुप्रिया सुळे यांची अशी एकाकी भेट… राजकीय समीकरणांमध्ये नवीन संकेत देणारी ठरते का, हे लवकरच स्पष्ट होईल.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube