तूरडाळचा भडका… जेवणातून वरण गायब! पण नेमकी कारणे काय?

तूरडाळचा भडका… जेवणातून वरण गायब! पण नेमकी कारणे काय?

दालफ्राय, डाळ भात, वरण भात… भाजीत डाळ, आमटीत डाळ. हे भारतीयांच्या जेवणातील आजपर्यंतचे दिसणारे सर्वसामान्य चित्र. तूरडाळीत (Turdal) कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटॅशियम, सोडियम, झिंक, तांबे, सेलेनियम, मॅंगनीज आणि प्रथिने हे घटक आढळतात. त्यामुळे आजारी माणसालाही तूरडाळीचे वरण आणि भात हे आवश्य खावे असा सल्ला दिला जातो. पण आता तुमच्या आमच्या जेवणातून पुढील वर्षभरासाठी तरी तूरडाळ गायब होण्याची शक्यता आहे.

याचे कारण आहे तूरडळीचे वाढलेले दर. सध्या किरकोळ बाजारात तूरडाळीचे दर 160 ते 200 रुपये प्रति किलो आहेत. विशेष म्हणजे हा भडका तात्पुरता नाही. हे दर पुढील वर्षभर कायम राहण्याची आणि त्यात काहीशी आणखीही वाढ होण्याची शक्यता आहे. (At present, the price of turdal in the retail market is 160 to 200 rupees per kg. These rates are likely to remain the same for the next year.)

पण हे दर नेमके का वाढत आहेत? आणि वर्षभर तरी दर चढेच राहण्यामागील कारणे काय आहेत?

केंद्रीय कृषी विभाग दरवर्षी शेतीमाल उत्पन्नाचा अंदाज वर्तविते असते. म्हणजे आपल्या देशात कोणते पिकाचे किती उत्पन्न होईल, याचा हा अंजाद असतो. यामुळे या वर्षी कोणत्या गोष्टीचा तुटवडा पडू शकतो, कोणत्या गोष्टी आयात कराव्या लागतील, कोणत्या गोष्टींचे दर वाढू शकतात याचा अंदाज सरकारला बांधता येतो आणि त्यानुसार धोरणे ठरविता येतात. याच अंदाजानुसार 2023-24 मध्ये तूरीचे 34.21 लाख टन उत्पन्न होईल असे अंदाज वर्तविण्यात आला.

खरचं नेहरूंनी भारतीयांना आळशी म्हटले होते का?; मोदींनी हायलाईट केलेल्या गोष्टीचं सत्य काय?

म्हणजे देशाला एका वर्षाला 46 लाख टन तूरडाळीची गरज भासते. म्हणजे इथेच 11 लाख टनाचा तुटवडा निर्माण झाला. त्यामुळे तूरडाळीची आयात करावी लागणार हे निश्चित होते. शिवाय दरही वाढणार. पण खरिपातील पेरण्यांच्या वेळी पावसाने ओढ दिली. इथे पहिला फटका बसला. त्यानंतर तूर काढणीच्या वेळी अवकाळी पाऊस झाला. इथे दुसरा फटका बसला. यामुळे आधीच तुटवडा भासणाऱ्या तूरडाळीच्या उत्पादनात आणखी 30 टक्क्यांपर्यंत घट येण्याचा अंदाज आहे. मागील सहा वर्षांतील हे नीचांकी उत्पादन ठरण्याची शक्यता आहे.

म्हणजे शंभर किलो तुरीपासून 60 ते 70 किलो तूरडाळ मिळत आहे. त्यामुळेच 11 लाख टनाचा तुटवडा 15 लाख टनावर गेला. इतक्या मोठ्या प्रमाणात तुरडाळ आयात करणे हे शक्य नाही. त्याचे कारण जगात तुरडाळ उत्पन्नात भारतचा पहिला नंबर लागतो. एकूण जागतिक तूर उत्पादनात भारताचा वाटा 70 टक्क्यांपर्यंत आहे. म्हणजे ‘आडात नाही तर पोहऱ्यात कुठून येणार’ अशी अवस्था. पण तरीही केंद्र सरकारने आफ्रिकेतील देश आणि म्यानमारला आयातीची शाश्वती देऊन त्याबाबतचे करारही केले आहेत. 2023-24 मधील एकूण जागतिक तूर उत्पादन सुमारे 50 लाख टनांच्या घरात राहण्याचा अंदाज आहे.

Narayan Rane : खासदाराचा सोपा प्रश्न पण, उत्तर देताना राणे गडबडले; राज्यसभेत नेमकं काय घडलं?

आता मूळ प्रश्न म्हणजे तुटवडा पडतो, भाव वाढतात मग शेतकरी तूरीच्या उत्पन्नाकडे का वळत नाहीत? तर त्याचे उत्तर आहे हमीभाव. केंद्र सरकारने जाहीर केलेला हमीभाव मिळण्याची कोणतीही शाश्वती नाही. त्यामुळे शेतकरी तूरीच्या उत्पन्नाकडे पाठ फिरवितात. 2022-23 या हंगामासाठी केंद्राने 6 हजार 600 रुपये हमीभाव जाहीर केला होता. पण तूरीचे दरच सरासरी पाच ते सहा प्रति क्विंटल राहिले. त्यामुळे शेतकऱ्यांना फारसा फायदा झाला नाही. याच सगळ्यामुळे पुढील वर्षभर तरी बाजारात तूरडाळीचे भाव चढेच राहण्याची किंवा आणखी वाढण्याची शक्यता आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube

संबंधित बातम्या

वेब स्टोरीज