खरचं नेहरूंनी 1959 मध्ये भारतीयांना ‘आळशी’ म्हटले होते?; मोदींनी ‘हायलाईट’ केलेल्या गोष्टीचं सत्य काय?

  • Written By: Published:
खरचं नेहरूंनी 1959 मध्ये भारतीयांना ‘आळशी’ म्हटले होते?; मोदींनी ‘हायलाईट’ केलेल्या गोष्टीचं सत्य काय?

नवी दिल्ली : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काल (दि.5) लोकसभेत केलेल्या भाषणात विरोधकांचा चांगलाच खरपूस समाचार घेतला. यावेळी त्यांनी पंडित नेहरूंनी (Pandit Nehru) केलेल्या एका विधानाचा संदर्भ दिला. त्यानंतर आता 1959 साली लाल किल्ल्यावरून खरचं पंडित नेहरूंनी भारतीयांचा आळशी असे संबोधले होते का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. 1959 साली घडलेल्या घटनेचा नेमका संदर्भ काय? यामागचं सत्य नेमकं काय? हे आपण जाणून घेऊया. (Did Nehru call Indians ‘lazy’ in his 1959 Independence Day speech?)

राजनाथ सिंह अन् अमित शाहंसाठी मोदींची तुफान बॅटिंग; काँग्रेसला घेतलं फैलावर

लोकसभेतील भाषणादरम्यान मोदींनी (PM Modi) काँग्रेसच्या एकूणच कार्यपद्धतीवर हल्लाबोल केला. आता मोदी एवढ्यावरच थांबतील असे कसे होईल. त्यांनी 1959 साली लाल किल्ल्यावर केलेल्या पंडित जवाहरलाल नेहरूंच्या भाषणाचा संदर्भ दिला. ज्यात नेहरूंनी भारतीयांना आळशी असे संबोधल्याचे मोदी यांनी सांगितले. भारतीयांना आळशी संबोधल्यावरून नेहरू भारतीयांना अन्य देशांच्या तुलनेत कमी लेखत होते असा घणाघातही मोदींनी यावेळी केला. 15 ऑगस्ट 1959 साली लाल किल्ल्यावरील देशाल उद्देशून भाषणात नेहरूंनी अन्य देशातील नागरिकांच्या तुलनेत भारतीय नागरिक आळशी आणि अल्प बुद्धी असल्याचे म्हटले होते.

काय म्हणाले होते पंडित नेहरू त्यांच्या भाषणात?

पण पंडित नेहरू 1959 च्या भाषणात म्हणाले होते की, भारतीय लोकांना कठोर कष्ट करण्याची सवय नाहीये. यात आमची चूक नाही. पण कधी कधी अशा सवयी लागतात असे नेहरू म्हणाले होते. परंतु, सत्य हे आहे की, आपण युरोपियन, जपान, चीन, रशिया किंवा अमेरिकेतील नागरिकांइतके कष्ट घेत नाही. हे देश जादूने विकसित झाले आहेत असे अनेकांना वाटू शकते मात्र, हे देश कठोर परिश्रम आणि बुद्धिमत्तेमुळे विकसित झाल्याचे नेहरूंनी देशाला उद्देशून केलेल्या भाषणात म्हटले होते. आपणही मेहनत आणि बुद्धीचा वापर करून पुढे मार्गक्रमण करू शकतो याशिवाय आपल्यासमोर दुसरा पर्याय नसल्याचे नेहरूंनी त्यांच्या भाषणात म्हटले होते.

PM Modi Speech : मोदींची गाडी पुन्हा विरोधकांवर घसरली; संसदेत रंगले ‘टोमणे’ नाट्य

यावेळी मोदींनी त्यांच्या भाषणात इंदिरा गांधींचाही उल्लेख केला. ते म्हणाले की, भारतीय आळशी असल्याचे नेहरूंसोबत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी याही मानत होत्या. एखादे काम पूर्णत्वास येत असते तेव्हा आपल्याला आत्मसंतुष्टतेची भावना येते. हे पाहता संपूर्ण देशाने पराभूत होण्याची वृत्ती स्वीकारली आहे. पण आज काँग्रेसमधील लोकांकडे पाहता, असे दिसते की, इंदिरा गांधी देशातील लोकांचे योग्य मूल्यांकन करू शकल्या नाहीत परंतु काँग्रेसचे त्यांनी अचूक मूल्यमापन केल्याचे मोदी म्हणाले. काँग्रेस पक्षाने कधीच भारतीयांच्या क्षमतेवर विश्वास ठेवला नाही असा गंभीर आरोपही मोदींनी यावेळी केला.

भाजप आयटी सेलचे प्रमुख यांनी ट्विट केलेले नेहरूंचे भाषण खालीलप्रमाणे :

follow us
  • fb
  • instagram
  • youtube