छत्तीसगडमधील सुकमामध्ये 16 नक्षलवादी ठार; नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक

छत्तीसगडमधील सुकमामध्ये 16 नक्षलवादी ठार; नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक

Sukma Naxal Encounter: छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात सुरक्षा दलांना मोठे यश आले आहे. माहितीनुसार, शनिवारी सकाळी सुकमामध्ये सुरक्षा कर्मचारी आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक (Sukma Naxal Encounter) झाली. यामध्ये 16 नक्षलवादी ठार झाल्याचे वृत्त आहे. केरळपाल पोलिस स्टेशन हद्दीतील जंगलात ही चकमक झाली. या कारवाईत दोन जवान देखील जखमी झाले आहे.

सुकमा एसपी किरण चव्हाण यांनी एएनआयला दिलेल्या माहितीनुसार, सुकमा-दंतेवाडा सीमेवरील उपमपल्ली केरळपाल परिसरातील जंगलात सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत 16 नक्षलवादी ठार झाले आहे. नक्षलवाद्यांशी सुरू असलेल्या चकमकीबाबत, बस्तरचे आयजी पी सुंदरराज यांनी सांगितले आहे की, 16 नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले आहेत. याशिवाय, या यशस्वी कारवाईत दोन सैनिक किरकोळ जखमी झाले.

तर घटनास्थळी डीआरजी आणि सीआरपीएफचे अतिरिक्त पथक पाठवण्यात आले आहे. याचबरोबर केरळपाल परिसरात माओवाद्यांच्या उपस्थितीच्या माहितीच्या आधारे शुक्रवारी रात्री सुरू केलेल्या कारवाईत जिल्हा राखीव रक्षक (DRG) आणि केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) चे जवान सहभागी होते, असे त्यांनी सांगितले. दोन्ही बाजूंनी अधूनमधून गोळीबार होत असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

मोठी बातमी! कुणाल कामराच्या अडचणीत वाढ, खार पोलीस ठाण्यात 3 गुन्हे दाखल 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube