GMC Doctor Suspension : मुख्यमंत्र्यांनी आपल्याच आरोग्यमंत्र्याला तोंडावर पाडलं…

GMC Doctor Suspension : मुख्यमंत्र्यांनी आपल्याच आरोग्यमंत्र्याला तोंडावर पाडलं…

GMC Doctor Suspension : गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे (Vishwajit Rane) यांनी डॉ. रुद्रेश कुट्टीकर (Rudresh Kuttikar) यांना निलंबित करण्याचे आदेश दिल्यानंतर मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांनी मध्यस्थी केलीयं. मुख्यमंत्री सावंत यांनी ट्विटद्वारे डॉ. रुद्रेश कुट्टीकर यांना निलंबित करणार नसल्याची घोषणाच केलीय. त्यामुळे आता गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आपल्याचं आरोग्यमंत्र्याला तोंडावर पाडलंय.

नेमकं प्रकरण काय?
गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी गोव्याच्या मेडिकल कॉलेजला भेट दिल्यानंतर तेथील कामाची तपासणी केलीयं. यावेळी कॅज्युल्टी विभागातील डॉ. रुद्रेश कुट्टीकर यांच्या उद्धट वर्तवणुकीबद्दल त्यांना आरोग्यमंत्र्यांनी थेट निलंबित केलं.

या प्रकारानंतर आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्या या कृतीवर अनेकांनी बोट ठेवलंय. त्यांच्या या कृतीविरोधात कारवाई करण्याची मागणी अनेकांकडून केली जात आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर जनसामान्यांकडून संतापाची लाट उसळत आहे.

“जागावाटपात ओढाताण झालीच तर शरद पवारांचा सल्ला घेऊ”, फडणवीसांचा खोचक टोला

एका वृद्ध महिलेसाठीच मी केलं… आरोग्यमंत्र्यांचा सूर
या घटनेनंतर आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी एक्सवर पोस्ट शेअर करीत आपली भूमिका स्पष्ट केलीयं. एका असहाय्य, वृद्ध महिलेसाठी मी हे केलं आहे, मी कायम अशीच मदत करीत राहीन. मी प्रत्येक रुग्णाच्या हक्कांसाठी आवाज उठवणार असून कृती करणार आणि लढा देणार असल्याचं आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय.

तसेच एका ज्येष्ठ नागरिकाच्या नातेवाईकाकडून मला एक संदेश प्राप्त झाला. त्या ज्येष्ठाला आधीच वेदना होत होत्या. डॉक्टरांनी त्यांना दररोज इंजेक्शन देण्याचा सल्ला दिला होता. मात्र, सुट्टीच्या दिवशी गोमेकॉच्या कॅज्युअल्टी विभागात त्यांना इंजेक्शन नाकारलं गेलं. त्यादिवशी रुग्णालयात फारशी गर्दीही नव्हती. तरीही माणुसकी दाखवली गेलेली नाही, असं आरोग्यमंत्री म्हणाले आहेत.

आमिर खानच्या घरी ‘सितारे जमीन पर’ टीमसाठी म्युझिकल नाईट! दिग्गजांची सरप्राइझ हजेरी

मी हस्तक्षेप केलायं, मला मान्य आहे. माझा सूर भाषा सौम्य असायला हवी होती. मी जबाबदारी स्विकारतो आणइ खात्री देतो की असा प्रकार पुन्हा होणार नाही. पण ज्येष्ठ नागरिकाला आरोग्यसेवा नाकारण्यात आली, त्यांच्या संरक्षणासाठीच मी उभा राहिलो, त्यामुळे मी या प्रकारामुळे माफी मागणार नसल्याचं त्यांनी सांगितलंय.

डॉक्टरांनी एका रुग्णासोबत चुकीची वर्तवणूक किले असून सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी रुग्णाला उपचारापासून वंचित ठेवले. यासंदर्भातील तक्रार आम्हाला एका वरिष्ठ पत्रकाराकडून मिळाली होती. त्यांच्या सासूला एका इंजेक्शन अत्यंत आवश्यकता होती. मात्र, डॉक्टरांनी इंजेक्शन देण्यास मज्जाव केला होता.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयानंतर राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून इंडियन मेडिकल असोसिएशन आणि वैद्यकीय क्षेत्रातील इतर सदस्यांनी डॉक्टरांवरील कारवाईवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केलीयं. सध्या मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्तक्षेपानंतर डॉक्टरांना पुन्हा कामावर रुजू करण्यात आलं असून देशभरात चर्चेचा विषय ठरत आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

संबंधित बातम्या