‘छावा’ पाहणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ‘या’ राज्यांत चित्रपट टॅक्स फ्री, CM मोहन यादव काय म्हणाले?

Chaava Movie Tax Free In Goa And Madhya Pradesh : ‘छावा’ चित्रपट (Chaava Movie) पाहणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. देशातील दोन राज्यांनी हा चित्रपट टॅक्स फ्री केलाय. त्यामुळे प्रेक्षकांना ‘छावा’च्या तिकिटावर आता कमी पैसे मोजावे लागणार आहेत. मध्य प्रदेशनंतर (Madhya Pradesh) आता ‘छावा’ हा चित्रपट गोव्यातही (Goa) करमुक्त झालाय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या 395 व्या जयंतीनिमित्त बुधवारी संध्याकाळी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी इंस्टाग्रामवर पोस्टद्वारे ही घोषणा केलीय.
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनीही छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित चित्रपट त्यांच्या राज्यात करमुक्त केलाय. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितलंय की, ‘छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आणि बलिदानावर आधारित ‘छावा’ हा (Entertainment News) चित्रपट गोव्यात करमुक्त होणार आहे. हे जाहीर करताना मला आनंद होतोय. त्यांनी यावर भर दिला की, हा चित्रपट संभाजी महाराजांच्या शौर्य आणि धैर्याचे चित्रण करतो. त्यांनी ‘देव, देश आणि धर्म’साठी मुघल आणि पोर्तुगीजांविरुद्ध लढा दिला.
मोठी बातमी! लाडक्या बहिणींना धक्का, आणखी दोन लाख अर्ज बाद; कारण काय?
मध्य प्रदेश राज्याने देखील ‘छावा’ या चित्रपटाला टॅक्स फ्री केलंय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी ‘छावा’ हा करमुक्त करण्याची घोषणा केली. छत्रपती संभाजी महाराज या महान योद्ध्यावर चित्रपट बनलाय, मग त्यावर टॅक्स का? म्हणून मी संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित ‘छावा ‘ हा चित्रपट करमुक्त करण्याची घोषणा करतो. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील छावा चित्रपटाला महाराष्ट्रात करमुक्त करण्याबद्दल प्रतिक्रिया दिलीय. .
छत्रपति शिवाजी महाराज जी की जयंती के अवसर पर उनके पुत्र संभाजी महाराज पर आधारित हिन्दी फिल्म ‘छावा’ को टैक्स फ्री करने की घोषणा करता हूं… pic.twitter.com/b6dm1sDH7P
— Dr Mohan Yadav (@DrMohanYadav51) February 19, 2025
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस छावा चित्रपटावर म्हणाले की, छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर एक अतिशय चांगला चित्रपट बनला आहे, याचा मला आनंद आहे. मी तो अद्याप पाहिलेला नाही, परंतु मला मिळालेल्या अभिप्रायावरून असं दिसून येतंय की, या चित्रपटात इतिहासाचे विकृतीकरण झालेलं नाही. यासोबतच फडणवीस यांनी सांगितलं की, महाराष्ट्राने 2017 मध्ये मनोरंजन कर आधीच रद्द केलाय. इतिहासाशी छेडछाड न करता हा चित्रपट बनवला गेला आहे. या चित्रपटाचा प्रचार करण्यासाठी आणि तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणखी काय करू शकतो, याबद्दल आम्ही विचार करू असं फडणवीस म्हणाले.
सिगारेटचा ‘धूर’ महागणार! सरकार मोठा निर्णय घेण्याच्या विचारात; नवी शिफारस काय?
विकी कौशलच्या ‘छावा’ या चित्रपटाने रिलीजच्या तिसऱ्या दिवशी बॉक्स ऑफिसवर 100 कोटींचा टप्पा ओलांडला. आता लवकरच तो 200 कोटींपर्यंत पोहोचणार आहे. या चित्रपटाने आतापर्यंत बॉक्स ऑफिसवरून 197.75 कोटी रुपये कमावले आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर यांनी केलंय. छावा’ चित्रपटात विकी कौशल छत्रपती संभाजी महाराजांची मुख्य भूमिका साकारत आहे. याशिवाय, रश्मिका मंदान्ना यांनी येसूबाई भोसलेची भूमिका साकारली आहे, अक्षय खन्नाने औरंगजेबाची भूमिका साकारली आहे.