नागाने धरला विकासचा पिच्छा, महिन्याभरात केला 6 वेळा दंश, स्वप्नात येऊन सांगितलं, ‘नवव्यांदा तू…’
युपीमधील एका 24 वर्षीय तरुणाच्या नाग इतका मागे लागलाय की, महिनाभरात एक-दोनदा नव्हे तर तब्बल सहा वेळा नागाने त्याला चावा घेतला.

Cobra Bites: नाग आणि त्यांचा बदला घेण्याच्या अनेक कथा-कहाण्या तुम्ही ऐकल्याच असतील. आताही असाच काहीसा प्रकार उत्तर प्रदेशमधून (Uttar Pradesh News) समोर आला. युपीमधील एका 24 वर्षीय तरुणाच्या नाग इतका मागे लागलाय की, महिनाभरात एक-दोनदा नव्हे तर तब्बल सहा वेळा नागाने त्याला चावा घेतला.
Ek Dok Tin Char Trailer: निपुण-वैदेहीच्या ‘एक दोन तीन चार’ सिनेमाचा धमाल ट्रेलर प्रदर्शित
फतेहपूरच्या मळवा पोलीस स्टेशन हद्दीतील सौरा गावातील रहिवासी असलेला विकास द्विवेदी याबाबत बोलताना सांगतो की, आतापर्यंत मला सहा वेळा नागाने चावा घेतला आहे. मात्र, प्रत्येकवेळी डॉक्टरांच्या शर्थीच्या प्रयत्नाननंतर मला जीवदान मिळाले. आता जेव्हा नाग मला दंश कऱणार असतो, ते मला आधीच कळून येतं, असं विकास सांगतो. आश्चर्यकारक बाब म्हणजे विकासला गेल्या 35 दिवसांत 6 वेळा नागाने चावा घेतला. आपल्याला फक्त शनिवारी आणि रविवारीच साप चावतो, असंही विकास म्हणाला.
पोर्श कार अपघात प्रकरणात अमितेश कुमारांवर काय कारवाई होणार? देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
सतत नाग दंश करत असल्याने विकास आपल्या नातेवाईकांकडे राहू लागला. विकास सांगतो की, जेव्हा तिसऱ्यांदा नाग चावला, तेव्हा मी आपल्या मावशीच्या घरी राहायला गेलो होता. कारण, इथे नाग चावणार नाही असं मला वाटलं. पण तिथेही नागाने येऊन मला दंश केला. त्यानंतर मी मावशीचं घर सोडून मामाच्या घरी आलो. पण तिथेही नागाने माझा पिच्छा पुरवून दंश केला.
तू वाचणार नाहीस
विकास सांगतो की, जेव्हा मला तिसऱ्यांदा नागाने चावा घेतला, त्या रात्री स्वप्नात नाग आला आणि म्हणाला, मी तुला 9 वेळा चावेन. 9 व्या वेळेपर्यंत तु वाचशील. पण नवव्यांदा तुला कोणतीही शक्ती, डॉक्टर वाचवू शकणार नाही. मग मी तुला माझ्याबरोबर घेईन, असे नागाने स्पनात येऊन म्हटल्याचा दावा विकासने केला.
दरम्यान, नागाने विकासला 6 वेळा दंश केल्यानं विकासचे कुटुंबीय आता प्रचंड घाबरले आहे. त्याच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनाही हा सर्व प्रकार पाहून धक्काच बसला आहे. आता पीडित विकासने यूपी सरकारकडे मदतीचे आवाहन केले आहे. त्याने सरकारला आपले आयुष्मान कार्ड बनवून देण्याची मागणी केली.