सपा नेते आझम खान यांना 10 वर्षाची शिक्षा अन् 14 लाखांचा दंड, नेमकं प्रकरण काय?
Azam Khan News : लोकसभा निवडणुकीचा (Lok Sabha elections) शेवटचा टप्पा सुरू झाला आहे. अशातच समाजवादी पक्षाला (Samajwadi Party) मोठा फटका बसला आहे. डुंगरपूर प्रकरणात सपा नेते आझम खान (Azam Khan) यांना एमपी-एमएलए न्यायालयाने (MP-MLA Court) 10 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. सोबतच त्यांना 14 वर्षांच्या कारावासाची शिक्षाही सुनावण्यात आली आहे.
हॉटेल व्यावसायिक जया शेट्टी हत्याप्रकरण; छोटा राजनला जन्मठेपेची शिक्षा
डुंगरपूर येथील जमीन बळकावल्याप्रकरणी आझम खान यांना कोर्टात दोषी ठरवण्यात आले आहे. आझम खान हे याआधी अनेक प्रकरणांमध्ये दोषी आढळले आहेत. त्यांनी 2019 मध्ये डुंगरपूर येथील वस्तीला बळजबरीने रिकाम केलं होतं. याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. रामपूरच्या खासदार-आमदार सत्र न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरू होती. अखेर न्यायालयाने काल आझम खान यांना दोषी ठरवले होते.
Ratan Tata यांची अशीही भूतदया! एक आदेश अन् भटका कुत्रा ‘ताज’मध्ये निवांत झोपतो…
आझम खान यांच्यावर डुंगरपूर वसाहत बळजबरीने रिकामी करणे, प्राणघातक हल्ला, तोडफोड, लूटमार आणि धमकावणे असे आरोप होते.
न्यायालयाने काल आझम खान यांना दोषी ठरवले होते आणि निकाल राखून ठेवला होता. त्यानंतर आज त्यांना 10 वर्षाची शिक्षा सुनावली. विशेष न्यायालयाचे न्यायाधीश डॉ. विजय कुमार यांनी ही शिक्षा सुनावली आहे. आझम खान सध्या सीतापूर कारागृहात आहेत. त्यांनाव्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे कारागृहात हजर करण्यात आले.
वकील काय म्हणाले?
वकील शिव प्रकाश पांडे म्हणाले, ‘जबरदस्तीने घर रिकामे करून ते पाडण्याच्या प्रकरणात रामपूरच्या विशेष खासदार-आमदार न्यायालयाने सपा नेते आझम खान यांना 10 वर्षांची शिक्षा सुनावली आहे आणि 14 लाखांचा दंडही ठोठावला आहे.’
सपा सरकारच्या काळात डुंगरपूरमध्ये आसरा घरे बांधण्यात आली होती. या ठिकाणी काही लोकांची घरे आधीच बांधलेली होती. ती सरकारी जमिनीवर असल्याचे कारण देत सन 2016 मध्ये पाडण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता. लुटमारीचा आरोपही पीडितांनी केला होता. 2019 मध्ये भाजप सरकार सत्तेवर आल्यानंतर प्रथमच या प्रकरणी रामपूरच्या गंज पोलिस ठाण्यात आझम खान यांच्यावर वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले होते.
आझम खान यांच्यासह कॉन्ट्रॅक्टरलाही दोषी ठरवण्यात आले आहे. डुंगरपूर प्रकरणात 12 गुन्हे दाखल झाले होते. अखेर कोर्टाने आज त्यांना दोषी ठरवलं.