Ratan Tata यांची अशीही भूतदया! एक आदेश अन् भटका कुत्रा ‘ताज’मध्ये निवांत झोपतो…

Ratan Tata यांची अशीही भूतदया! एक आदेश अन् भटका कुत्रा ‘ताज’मध्ये निवांत झोपतो…

Taj Hotel News : प्रसिद्ध उद्योजक रतन टाटा (Ratan Tata) हे समाजकार्यातून अनेकदा चर्चेत आले आहेत, आता पुन्हा एकदा याचीच प्रचिती आलीयं, मुंबईतील ताज हॉटेलच्या (Taj Hotel) दरवाजासमोर स्वत:हुन भटका कुत्रा आल्यास त्याला निवांतपणे झोपू देण्याचा आदेश रतन टाटांनी काढलायं. रुबी खान नामक महिलेने ताज हॉटेलच्या दरवाजासमोर निवांत झोपलेल्या एका भटका कुत्र्याचा फोटो घेतला. हा फोटो तिने सोशल मीडियावर पोस्ट करीत संपूर्ण स्टोरीच सांगितलीयं.

Rrr

Rrr

रुबी खानने पोस्टमध्ये म्हटले, ताज हॉटेलच्या दरवाजामध्ये भटका कुत्रा आल्यास त्याला हटकू नका, त्याला हवं तिथं झोपू द्या, हॉटेलच्या आवारात असे मुके प्राणी येत असतील, झोपत असतील त्यांना न हटकण्याचा फतवा रतन टाटा यांनी दिला असल्याचं रुबीने म्हटलंय.

…तेव्हा कोश्यारी अन् चंद्रकांत पाटलांनी माफी मागितली का? आव्हाडांचा भाजपला थेट सवाल

त्याचं झालं असं की, रुबी खान हॉटेलमध्ये गेली असता, तिला हॉटेलच्या दरवाजासमोर एक भटका कुत्रा निवांत झोप घेत असल्याचं दिसलं. तिने पाहिलेल्या दृश्याचा फोटो घेण्याचा मोह तिला आवरला नाही. तिने तत्काळ भटका कुत्र्याचा फोटो घेतला आणि हॉटेलच्या कर्मचाऱ्याकडे विचारपूस केली. त्यावर हॉटेलच्या कर्मचाऱ्याने याबाबत स्पष्टपणे सांगितलं असल्याचं रुबीने म्हटलंय.

पुण्यातील हिंजवडी आयटी पार्कमधील 37 आयटी कंपन्यांनी गाशा गुंडाळला, काय आहे नेमकं प्रकरण?

रुबी खानच्या या पोस्टनंतर नेटकऱ्यांकडून अनेकांनी कमेंटचा वर्षावर केलायं. या माध्यमातून रतन टाटा यांचं प्राण्यांविषयी असलेल्या प्रेमाच दर्शन झालं असल्याचं अनेकांनी म्हटलंय. तर ताज हॉटेलकडून माहिती शेअर केल्याबद्दल रुबी खानचे आभारही मानले आहेत.

रुबीच्या पोस्टवर ‘ताज हॉटेल’ची प्रतिक्रिया :
नमस्कार रुबी, ही माहिती शेअर केल्याबद्दल धन्यवाद, ताज हॉटेलमध्ये आलेल्या पाहुण्याला ताज हे त्यांचं घर वाटणार याची आम्हाला खात्री आहे. आम्ही सहानुभूती आणि सर्वसमावेशाला अधिक महत्व देत असतो. तुमचे विचार आमच्या मूळ मूल्यांशी जुळणार असल्याची प्रतिक्रिया ताज हॉटेलकडून देण्यात आलीयं.

दरम्यान, उद्योगपती रतन टाटा समाजकार्यातून कायमच चर्चेत असतात. रुबी खान यांनी आज पोस्ट शेअर केल्यानंतर त्यांचं प्राण्यांविषयीचं प्रेम अधोरेखित झालं. याआधी त्यांनी प्राणीप्रेमी म्हणूनही ओळखले जायचं. रतन टाटा यांना कुत्र्यांबद्दल असलेलं विशेष प्रेम यातून स्पष्ट होतं.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज