टोल माफी ते कौशल्य विद्यापीठाला रतन टाटांचे नाव; शेवटच्या बैठकीत शिंदेंचे धडाकेबाज 19 निर्णय
मुंबई : विधानसभेसाठी आचरसंहिता लागण्यापूर्वी पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या (Cabinet Decision) बैठकीत अनेक धडाकेबाज निर्णय घेण्यात आले आहेत. यात प्रमुख निर्णय म्हणजे मुंबईत प्रवेश करणाऱ्या पाचही टोल नाक्यांवर हलक्या वाहनांना आज मध्यरात्रीपासून टोल माफी देण्यात आली आहे. याशिवाय आजच्या बैठकीत राज्य कौशल्य विद्यापीठाला रतन टाटा (Ratan Tata) यांचे नाव देण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. आजच्या बैठकीत सरकारने धडाकेबाज निर्णय घेतले असून, हे निर्णय कोतते ते पाहूया.
Maharashtra Govt to name state skills university after Ratan Tata: CM Eknath Shinde
— Press Trust of India (@PTI_News) October 14, 2024
मंत्रिमंडळात घेण्यात आलेले निर्णय कोणते?
1. मुंबईतल्या ५ प्रवेश मार्गांवरील पथकर (टोल) हलक्या वाहनांसाठी माफ. आज रात्रौ १२ पासून अंमलबजावणी. (सार्वजनिक बांधकाम)
2.आगरी समाजासाठी महामंडळ (सामाजिक न्याय)
3.समाजकार्य महाविद्यालयांमधील अध्यापकांना करिअर ॲडव्हान्समेंट स्किम (उच्च व तंत्रशिक्षण)
4.दमणगंगा एकदरे गोदावरी नदी जोड योजनेस मान्यता (जलसंपदा)
5.आष्टी उपसा सिंचन योजनेस सुधारित मान्यता (जलसंपदा)
6.वैजापूरच्या शनीदेवगाव बंधाऱ्यास प्रशासकीय मान्यता (जलसंपदा विभाग)
7.राज्य शेती महामंडळाची जमीन एमआयडीसीला हस्तांतरित (महसूल)
8.पाचपाखाडी येथील जमीन ठाणे मनपास प्रशासकीय भवनासाठी (महसूल)
9.खिडकाळी येथील जमीन हायब्रिड स्किल विद्यापीठासाठी विनामूल्य (महसूल)
मुख्यमंत्री @mieknathshinde यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) October 14, 2024
10.राज्यात प्रधानमंत्री आवास योजना (शहरी ) २.० राबविणार
11.पुणे मेट्रो रेल टप्पा-२ मधील रेल्वे मार्गिंकांच्या कामांना मान्यता (नगर विकास)
12.किल्लारीच्या शेतकरी सहकारी कारखान्याचे कर्ज व्याजासह माफ (सहकार)
13.अडचणीतील सहकारी उपसा जलसिंचन योजनांचे थकीत कर्ज माफ (सहकार)
14.मिरजच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात इमर्जन्सी मेडिसिनची ३ पदे (वैद्यकीय शिक्षण)
15.खंड क्षमापित झालेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना जुनी पेन्शन योजना (वैद्यकीय शिक्षण)
16.मराठी भाषेविषयक जनजागृतीसाठी पंधरवडा (मराठी भाषा)
17.अण्णासाहेब जावळे मराठवाडा विकास मंडळासाठी अभ्यासगट
18.उमेदसाठी अभ्यासगट (ग्राम विकास)
19.कौशल्य विद्यापीठास रतन टाटा यांचे नाव (कौशल्य विकास).
Raj Thackeray : टोल आंदोलनाचं काय झालं? असं कुणी विचारलं तर त्यांना मुंबईचं उदाहरण द्या!
यापूर्वी म्हणजेच रतन टाटा यांच्या निधनानंतर राज्य सरकारतर्फे देण्यात येणारा उद्योग रत्न पुरस्कार ‘रतन टाटा उद्योग रत्न पुरस्कार’ पुरस्कार म्हणून दिला जाणार असल्याची घोषणा केली होती. तसेच मुंबईत उभारल्या जाणाऱ्या सर्वात मोठ्या उद्योग भवन इमारतीलादेखील रतन टाटा यांचे नाव दिले जाणार असल्याचे सामंत यांनी सांगितले होते. त्यानंतर आता राज्य कौशल्य विद्यापीठाला रतन टाटा यांचे नाव देण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे.