OK TATA : ट्रकच्या मागे लिहिलेल्या ‘ओके टाटा’ शब्दांचा अन् रतन टाटांचा संबंध काय?

  • Written By: Published:
OK TATA : ट्रकच्या मागे लिहिलेल्या ‘ओके टाटा’ शब्दांचा अन् रतन टाटांचा संबंध काय?

Ratan Tata : प्रवासादरम्यान आपल्यापैकी अनेकांनी रस्त्यांवरून चालणाऱ्या ट्रकच्या मागे कविता किंवा अन्य मजकूर लिहिलेला वाचला अथवा पाहिला असेल. त्यात बहुतांश ट्रकच्या मागे नंबरपेक्षा मोठ्या अक्षरात दोन ओके टाटा असे लिहिलेले असते. मात्र, बहुतेक लोकांना त्याचा अर्थ माहित नाहीये. याचा अर्थ काय आहे आणि त्याचा रतन टाटा (Ratan Tata) यांच्याशी काय संबंध आहे ते जाणून घेऊया.

श्रीमंत योगी : राज ठाकरे यांचा रतन टाटांबद्दल भावपूर्ण ब्लॉग

OK TATA अन् टाटांचा काय संबंध?

दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ओके टाटा लिहिलेले दिसत नाही, तर ट्रकवर असे का लिहिले जाते? असा प्रश्न अनेकांच्या मनात येतो. याचे उत्तर टाटा समूहाकडून मिळते. आता ओके टाटा हे शब्द कोणत्या ट्रकवर लिहिलेले असतात तर, याचे उत्तर थेट आहे आणि ते म्हणजे टाटा ग्रुपने उत्पादित केलेले ट्रक होय.

का लिहिले जाते OK TATA

टाटा कंपनीकडून निर्मिती केलेल्या ट्रकवर OK TATA असे लिहिलेले असते हे एक कारण झाले. तर, दुसरे कारण म्हणजे ज्या ट्रकवर ओके टाटा लिहिले असते त्याचा अर्थ त्या वाहनाची चाचणी झाली असून, ते वाहन अधिक चांगल्या स्थितीत आहे. याशिवाय हे या वाहनाची निर्मिती टाटा मोटर्सच्या मानकांनुसार आणि दुरुस्ती केली गेल्याचे दर्शवतो. तसेच या वाहनांची वॉरंटी फक्त टाटांकडेच आहे, ही ओळही याची पुष्टी करते.

विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती अन् विदेशात शिक्षणाची संधी; टाटा समुहाच्या स्कॉलरशीप योजना किती ?

OK TATA शब्द कसे बनले ब्रँडिंग शस्त्र?

ओके टाटा… जरी कंपनीने आपल्या पॉलिसीसाठी हे दोन शब्द बनवले आणि ट्रक्सवर लिहिले, पण हळूहळू ते एक ब्रँडिंग शस्त्र बनले. हे ट्रक्सच्या माध्यमातून संपूर्ण देशात लोकप्रिय झाले. आजही जर तुम्ही एखाद्याला ओके टाटा म्हणाल तर त्याला समजेल की हा शब्द कुठे जास्त लिहिला जातो.

देशातील सर्वोच्च कंपनी

ट्रक बनवणारी टाटा मोटर्स आज देशातील सर्वोच्च ऑटोमोबाईल कंपनी असून, ही कंपनी स्वातंत्र्यापूर्वी 1954 मध्ये टाटा इंजिनीअरिंग आणि लोकोमोटिव्ह कंपनी (TELCO) म्हणून सुरू करण्यात आली. नंतर त्याचे नाव बदलून टाटा मोटर्स करण्यात आले. त्यावेळी ही कंपनी ट्रेनचे इंजिन बनवत असे. तेव्हा दुसरे महायुद्ध चालू होते आणि टाटांनी भारतीय सैन्याला एक टँक दिला, जो टाटानगर टँक म्हणून ओळखला जात होता.

काही काळानंतर टाटांनी ऑटोमोबाईल उद्योगात प्रवेश केला. मर्सिडीज-बेंझसोबत भागीदारी केली आणि 1954 मध्ये व्यावसायिक वाहने सुरू केली. 1991 मध्ये, कंपनीने प्रवासी वाहनांच्या क्षेत्रात प्रवेश केला आणि पहिले स्वदेशी वाहन टाटा सिएरा लाँच केले. अशाप्रकारे एकामागून एक वाहने लाँच करून टाटाने इतिहास रचला आणि देशातील टॉप ऑटोमोबाईल कंपनी बनली.

Ratan Tata: ‘तुम्ही गेलात…’; कधीकाळी रतन टाटा यांना डेट करणाऱ्या अभिनेत्रीला शोक अनावर!

यानंतर कंपनीने टाटा इस्टेट आणि टाटा सुमो भारतीय बाजारात लॉन्च करण्यात आली. टाटा सुमोने भारतीयांमध्ये एक विशेष स्थान निर्माण केले. यानंतर भारतीय बाजारपेठेत आलेली टाटा इंडिका लोकप्रिय झाली. टाटाची ही पहिली फॅमिली कार 1998 मध्ये लॉन्च झाली होती. ज्याने विक्रीतही विक्रम केला.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube