ऐन निवडणुकीत शरद पवारांना मोठा धक्का, बाहुबली नेत्याने सोडली पक्षाची साथ
Salil Deshmukh Resign : राज्यात सध्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु असून प्रत्येक पक्ष जोरदार तयारी करताना दिसत आहे. या दरम्यान राष्ट्रवादी
Salil Deshmukh Resign : राज्यात सध्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु असून प्रत्येक पक्ष जोरदार तयारी करताना दिसत आहे. या दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का बसला आहे. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे पुत्र सलील देशमुख यांनी पक्षाची साथ सोडली आहे. प्रकृतीचे कारण देत त्यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. सलील देशमुख यांनी पत्रकार परिषद घेत पक्षाचा राजीनामा दिला असल्याची माहिती दिली आहे.
या पत्रकार परिषदेमध्ये सलील देशमुख म्हणाले की, सहा महिन्यांपासून तुमच्यापैकी काहींना माहिती असेलच माझी प्रकृती थोडी अस्वस्थ आहे. माझी प्रकृती चांगली नसल्यामुळे मी काही कालखंडासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा राजीनामा देत आहे असं या पत्रकार परिषदेमध्ये सलील देशमुख म्हणाले.
पुढे या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना सलील देशमुख (Salil Deshmukh) म्हणाले की, या राजीनाम्याचा कारण म्हणजे गेल्या काही महिन्यांपासून माझी प्रकृती खूप काही चांगली नसल्यामुले मी राजीनामा देत आहे. पुढील काही महिन्यात प्रकृती आणखी चांगली करु आणि मग जोमाने लोकसेवेत लागू म्हणून मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.
राष्ट्रवादी पक्षाने आणि शरद पवारांनी (Sharad Pawar) माझ्या कुटुंबाला खूप काही दिले आहे. खूप मानसन्मान आपल्याला पक्षात भेटला आहे. येणाऱ्या दिवसांमध्ये आपल्याला लोकसभा करायची आहे, मोठे प्रकल्प, मोठी विकास कामे करायची आहे असं देखील यावेळी सलील देशमुख म्हणाले. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरु असून पक्षाकडे मोठ्या प्रमाणात इच्छुक उमेदवारांची यादी असल्याची माहिती पक्षाकडून देण्यात आली आहे.
ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताचा पराभव, पहलगाम हल्ला ‘बंडखोरीचा हल्ला’; अमेरिकेचा धक्कादायक अहवाल
