Ahmedabad Plane Crash मधील मृतांच्या कुटुंबियांना टाटा ग्रुप कडून प्रत्येकी 1 कोटींची मदत जाहीर

Ahmedabad Plane Crash मधील मृतांच्या कुटुंबियांना  टाटा ग्रुप कडून प्रत्येकी 1 कोटींची मदत जाहीर

Tata Group announces Rs 1 crore assistance each to families of those killed in Ahmedabad Plane Crash : गुजरातच्या अहमदाबाद (Ahmedabad Plane Crash) येथील मेघानी नगर परिसरात 12 जून गुरुवारी दुपारी 1.30 च्या सुमारास एअर इंडियाचे प्रवासी विमान कोसळले (Ahmedabad Plane Crash) असून या विमान अपघातात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी (Vijay Rupani) यांच्यासह विमानातील सर्व प्रवाशांचा मृत्यू झाला असल्याचा दावा असोसिएडेट प्रेस या संस्थेने स्थानिक पोलिसांच्या हवाल्याने केला आहे. या अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना टाटा ग्रुप कडून प्रत्येकी एक कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.

चमत्कार ! अहमदाबाद विमान अपघातातून विश्वशकुमार रमेश बचावला

या अपघातातील (Ahmedabad Plane Crash) मृतांच्या नातेवाईकांना टाटा ग्रुप कडून प्रत्येकी एक कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.त्याचबरोबर आम्ही जखमींच्या उपचाराची देखील जबाबदारी घेत आहोत. असे देखील टाटा ग्रुप कडून सांगण्यात आला आहे. तर दुसरीकडे या विमान अपघातामध्ये नुकसान ग्रस्त झालेल्या बी जे मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलची पुनर्निर्मिती करण्यासाठी मदत केली जाणार असल्याचं देखील टाटा ग्रुप कडून सांगण्यात आलं आहे.

दादरी ते अहमदाबाद… देशातील दहा मोठे विमान अपघात

विमान अपघातात जखमी झालेल्या काही प्रवाशांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, परंतु त्यांची प्रकृती गंभीर आहे आणि त्यांना वाचवणे खूप कठीण असल्याची माहिती आयुक्त मलिक यांनी असोसिएडेट प्रेसला दिली आहे. घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे, परंतु ढिगारा आणि आगीची स्थिती पाहता परिस्थिती खूप आव्हानात्मक आहे. असं देखील आयुक्त मलिक म्हणाले.

प्रेमाची जादू परत येतेय… ‘बडे अच्छे लगते हैं – नव्या पर्वा’सह, 16 जूनपासून प्रेक्षकांच्या भेटीला

माहितीनुसार, बोईंग 787-8 ड्रीमलाइनर या विमानात 242 लोक होते, ज्यात 230 प्रवासी आणि 12 क्रू मेंबर्स होते. ड्रीमलाइनर विमानने टेकऑफ केल्यानंतर लगेच कोसळला. याच विमानामध्ये कृ मेंबर असलेल्या अपर्णा महाडिक या राष्ट्रवादीचे खासदार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या भाचे सून असून या देखील याच विमानात होत्या. घटनास्थळी (Ahmedabad Plane Crash) सध्या बचाव कार्य सुरु आहे. घटनास्थळी लष्कराचे 130 जवान बचावकार्याचे काम करत आहे. तर दुसरीकडे या अपघातामध्ये सर्व 242 लोकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. तर डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत 51 जणांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातात सर्व 242 प्रवाशांचा मृत्यू

तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अपघाताची माहिती घेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि नागरी उड्डाण मंत्री राम मोहन नायडू यांना अहमदाबादला (Ahmedabad Plane Crash) जाऊन विमान अपघातानंतर बाधितांना सर्वतोपरी मदत मिळावी याची खात्री करण्यास सांगितले आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube