मुलींच्या शिक्षणासाठी अनवाणी मॅरेथॉन धावणाऱ्या रमाबाईंची राष्ट्रीय महिला आयोगाकडून दखल; 1 लाखाचं सहाय्य

National Commission for Women provides assistance to Ramabai मुलींच्या शिक्षणासाठी धावणाऱ्या रमाबाईंची दखल राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली

National Commission For Women

National Commission for Women provides one lakh in assistance to Ramabai, who ran marathon barefoot for girls’ education : आपल्या मुलींच्या शिक्षणासाठी बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथे रमाबाई अशोक रणवीर या साडी नेसून, पायातील चप्पल हातात घेऊन अनवाणी मॅरेथॉन धावल्या होत्या. त्यानंतर आता त्यांच्या या अथक प्रयत्नाची दखल राष्ट्रीय महिला आयोगाकडून घेण्यात आली आहे. त्यांना एक लाखाचं आर्थिक सहाय्य देण्यात आलं आहे.

विद्यानंद बापटांना शरद पवारांचं समर्थन; बापटांवर झालेल्या हल्ल्याचा पवारांनी केला निषेध

याबाबत राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी रमाबाईजींशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून त्यांच्याशी संवाद साधला आणि या आर्थिक सहकार्याची माहिती दिली. त्यांनी रमाबाईंशी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधला. मुलींच्या शिक्षणासाठी एक आई किती जिद्दीने, धैर्याने आणि समर्पणाने संघर्ष करू शकते, याचे रमाबाईजींचे उदाहरण अत्यंत प्रेरणादायी आहे. त्यांच्या या जिद्दीने आणि मातृत्वाच्या शक्तीने असंख्य जणांना प्रेरणा दिलीय. असं रहाटकर म्हणाल्या.

पुनीत बालन ग्रुपच्या डीजेमुक्त दहीहंडीचा यंदाही जल्लोष; लाल महाल चौकात सार्वजनिक गणेश मंडळांची संयुक्त दहीहंडी

काही महिन्यांपूर्वी अखिल भारतीय तेरापंथ महिला मंडळाच्या वतीने मला प्रतिष्ठित ‘आचार्य तुलसी कर्तृत्व पुरस्कार’ प्रदान करण्यात आला होता. या पुरस्कारासोबत मानचिन्ह आणि रोख रक्कम देण्यात आली होती.रमाबाईजींची प्रेरणादायी कहाणी समोर आल्यानंतर त्या पुरस्कारातून मिळालेल्या रकमेतून एक लाख रुपये श्रीमती रमाबाईंना देण्याचा निर्णय मी घेतला आहे.

सोलापुरात डीजेबंदी; उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

ही रक्कम त्यांच्या संघर्षाची किंवा त्यांच्या कर्तृत्वाची किंमत नाही; त्यांनी मला स्वतःला आणि समाजातील अनेकांना दिलेल्या प्रेरणेप्रती कृतज्ञतेची ही एक छोटीशी पाकळी आहे.रमाबाईजी मूळच्या हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील आहेत. याबाबत हिंगोलीचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्याशीही मी संवाद साधला असून, रमाबाईजी आणि त्यांच्या दोन्ही मुलींना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याबाबत त्यांना सूचना केल्या आहेत.

 

follow us