कारवाई करा अन्…, राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली पुण्यातील घटनेची दखल
NCW On Nasrapur Case : राष्ट्रीय महिला आयोगाने पुण्यातील घटनेची " सुओ मोटो " दखल घेतली आहे. राष्ट्रीय महिला आयोगाने नॅशनल कमिशन
NCW On Nasrapur Case : राष्ट्रीय महिला आयोगाने पुण्यातील घटनेची ” सुओ मोटो ” दखल घेतली आहे. राष्ट्रीय महिला आयोगाने नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राइट्स यांना या प्रकरणाची दखल घेऊन तपासावर देखरेख ठेवण्याचे आणि दोषींना कठोर शिक्षा मिळावी यासाठी आवश्यक ती कारवाई करण्याचे आदेश दिले आहे. तसेच पीडित कुटुंबाला तातडीने मदत व नुकसानभरपाई देण्यासाठी आयोगाकडून प्रयत्न करण्यात येणार आहे. वेळेत आरोपपत्र दाखल करणे आणि फास्ट ट्रॅक न्यायालयात जलद सुनावणी सुनिश्चित करण्यावरही आयोगाकडून भर असणार असल्याची माहिती राष्ट्रीय महिला आयोगाकडून देण्यात आली आहे.
राष्ट्रीय महिला आयोगाने जारी केलेल्या निवेदनात या अमानुष कृत्याचा तीव्र शब्दांत निषेध करताना, आयोगाने असे नमूद केले आहे की, अशा प्रकारचे गुन्हे हे बालकांच्या हक्कांचे गंभीर उल्लंघन ठरतात आणि समाजातील सुरक्षा यंत्रणांच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करतात. आयोगाच्या अध्यक्षांनी ‘राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाला’ (NCPCR) या प्रकरणाची तात्काळ दखल घेण्याची, तपासावर योग्य देखरेख ठेवण्याची आणि गुन्हेगारांना शक्य तितकी कठोर शिक्षा मिळावी यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याची विनंती केली आहे. याव्यतिरिक्त, पीडितेच्या कुटुंबाला तात्काळ मदत आणि नुकसानभरपाई मिळवून देण्यावर, ‘पॉक्सो’ (POCSO) कायद्यांतर्गत ठराविक मुदतीत दोषारोपपत्र दाखल करण्यावर आणि ‘जलदगती न्यायालयात’ (Fast Track Court) खटल्याची सुनावणी त्वरित पूर्ण करण्यावर विशेष भर देण्यात आला आहे. प्रत्येक मुलीची सुरक्षा आणि तिला न्याय मिळवून देणे, हीच आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे असं आयोगाकडून सांगण्यात आले आहे.

4 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार अन् हत्या
1 मे रोजी पुण्यातील भोर तालुक्यातील नसरापूर गावात एका 65 वर्षीय व्यक्तीने 4 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करुन तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडल्याने संपूर्ण राज्यात संतापाची लाट पसरली आहे. या घटनेनंतर आरोपीला फाशीची शिक्षा द्या अशी मागणी नसरापूर गावातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.
जमीन वादातून वहिनी-पुतणीची हत्या मग पाठलाग करत पुतण्यावर तलवारीने सपासप वार; सोलापुरात खळबळ
या मागणीसाठी गावकरांनी नवले पूलवर आंदोलन करत रस्ता रोखला होता. आरोपीने चिमुकलीला आमिष दाखवून गोठ्यात चिमुकलीवर अमानुष लैंगिक अत्याचार केले आणि त्यानंतर दगडाने ठेचून तिची निर्घृण हत्या केली. हत्येनंतर त्याने त्या निष्पाप चिमुकलीचा मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला.