जमीन वादातून वहिनी-पुतणीची हत्या मग पाठलाग करत पुतण्यावर तलवारीने सपासप वार; सोलापुरात खळबळ

Solapur Triple Murder Case : सोलापूर जिल्ह्यातील बोरामणी जवळ असलेल्या मस्के वस्तीत जमिनीच्या वादातून एकाच कुटुंबातील तीन जणांची क्रुरपणे

Solapur Triple Murder Case

Solapur Triple Murder Case : सोलापूर जिल्ह्यातील बोरामणी जवळ असलेल्या मस्के वस्तीत जमिनीच्या वादातून एकाच कुटुंबातील तीन जणांची क्रुरपणे हत्या करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. यामध्ये आई, मुलगी आणि 17 वर्षीय मुलाचा समावेश आहे. या धक्कादायक घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून या प्रकरणातील आरोपी फरार असून पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जात आहे.

ही घटना रात्रीच्या वेळी घडल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत असून आरोपीने मस्के कुटुंब झोपेत असताना हल्ला केल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे.

या प्रकरणात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उन्हाळा असल्याने (Solapur Triple Murder Case) गायत्री मस्के (36), त्यांची मुलगी प्रियंका मस्के (20) आणि मुलगा शिवराज मस्के (17) रात्री घराच्या गच्चीवर झोपण्यासाठी गेले होते. याचा फायदा घेत अज्ञात हल्लाखोरांनी गच्चीवर चढून त्यांच्यावर तलवारीने हल्ला केला. या हल्ल्यात गायत्री मस्के आणि प्रियंका मस्के यांचा जागीत मृत्यू झाला तर 17 वर्षीय शिवराजने आई आणि बहिणीला वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र हल्लेखोरांनी त्याच्या हातावर वार केल्यानंतर तो जीव वाचवण्यासाठी गच्चीवरुन पळाला मात्र हल्लेखोरांनी त्याचा पाठलाग करत त्याला गाठून घरातील एका खोलीत त्याच्यावर तलवारीने वार करत त्याचा जीव घेतला.

नेमकं कारण काय?

सध्या समोर आलेल्या माहितीनुसार, मस्के कुटुंबाची परिसरात दीड एकर जमीन आहे. सध्या या जमिनीची किंमत 75 लाखांच्या आसपास आहे. याच जमिनीवरुन गेल्या काही दिवसांपासून कुटुंबात वाद सुरु होता आणि याच वादातून तिघांची हत्या करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

कोणाल लाभ अन् कोणाला नुकसान, जाणुन घ्या आजचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहणार ?

तर दुसरीकडे या प्रकरणानंतर गायत्री मस्के यांचा दीर पप्पू मस्के फरार असल्याने तोच या हत्याकांडाचा मास्टमाईंड असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पप्पू मस्के याचा शोध घेण्यासाठी सोलापूर तालुका पोलिसांनी सहा पथके तयार केली असून लवकरच आरोपीला अटक करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

follow us