बदलीचा धडाका! 25 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोल्हापूर, नागपूर, सोलापुरात नवे जिल्हाधिकारी

राज्यातील 25 IAS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदली करण्यात आली असून कोल्हापूर, नागपूर आणि सोलापुरला नवे जिल्हाधिकारी मिळाले आहेत.

Untitle (23)

IAS Officer Transfer : राज्य सरकारकडून IAS अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले असून यामध्ये प्रामुख्याने कोल्हापूर, नागपूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर यांसारख्या महत्वांच्या शहरातील जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांचा समावेश आहे. या बदलीमुळे अनेक जिल्ह्यांना नवे जिल्हाधिकारी मिळाले असून महापालिकांना नवे आयुक्त मिळाले आहेत.

प्रभावशाली व्यक्तींच्या नातेवाईकांच्या नावानेही खाती उघडल्याचा संशय; अशोक खरात प्रकरणात नवे धागेदोरे समोर

राज्य सरकारच्या फेरबदलानुसार छत्रपती संभाजीनगरमध्ये विनय गौडा जी.सी. यांची बदली करण्यात आली असून गौडा हे आधी चंद्रपूर जिल्ह्यात जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते. तर नागपूर जिल्हाधिकारीपदी कुमार आशिर्वाद यांची बदली झाली असून ते पूर्वी सोलापूरचे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते. तर कोल्हापुरात डॉ. विजय राठोड, सोलापूरला कार्तिकेयन एस., चंद्रपूरला श्रीमती वसुमना पंत, लातूला डॉ. भारत बस्तेवाड, बुलढाण्यात डॉ. प्रवीणकुमार देवरे, गोंदियात डॉ. मंगेश गोंदवले यांची बदली करण्यात आलीयं.

A Massive Reshuffle in Maharashtra: महाराष्ट्र राज्य प्रशासनात मोठा फेरबदल करण्यात आला असून, राज्य सरकारने एकूण २५ आयएएस (IAS) अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. यामध्ये प्रामुख्याने छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, नागपूर आणि सोलापूर यांसारख्या महत्त्वाच्या शहरांतील जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांचा समावेश आहे. या फेरबदलात अनेक जिल्ह्यांना नवे जिल्हाधिकारी मिळाले आहेत, तर काही महापालिकांच्या आयुक्तपदी नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

महापालिका आयुक्त स्तरावरील बदल

छत्रपती संभाजीनगर : अमोल येडगे (पूर्वीचे कोल्हापूर जिल्हाधिकारी)
कोल्हापूर : डॉ. राजेंद्र भारुड
अमरावती : श्रीमती वर्षा लड्डा
सांगली-मिरज-कुपवाड : श्रीमती संजिता मोहपात्रा
जालना : श्रीमती अंजली शर्मा

पुणे जिल्हा परिषदेत सत्ता समीकरणे बदलली; बारामती बाहेर, इंदापूर आत, राष्ट्रवादीचा निर्णायक डाव

यासोबतच इतरही 12 अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली असून यामध्ये कृष्णकांत कन्वरिया यांची शहादा सहाय्यक जिल्हाधिकारी तर अंजली शर्मा यांची नंदुरबार जिल्हाधिकारी, जास्मिन यांची राजापूर येथे सहाय्यक जिल्हाधिकारी, सत्यम गांधी यांची सांगलीच्या मनपा आयुक्तपदी तसेच मिन्नू पी.एम यांची जालना जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, संजिता मोहपात्रा यांची अमरावती जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, कार्तिकेयन एस. कोल्हापुर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी, अंकित छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तर प्रजित नायर यांची गोंदियाच्या जिल्हाधिकारीपदी बदली करण्यात आलीयं.

follow us