विद्यानंद बापटांना शरद पवारांचं समर्थन; बापटांवर झालेल्या हल्ल्याचा पवारांनी केला निषेध
Sharad Pawar on Vidyanand Bapat शरद पवारांनी विद्यानंद बापट यांच्यावर झालेल्या हल्याचा निषेध करत त्यांनी मांडलेल्या मुद्द्यांचे समर्थन केले.
Sharad Pawar Reacts to Vidyanand Bapat Attack: पुण्यासह राज्यात ‘डीजेमुक्त गणेशोत्सव’ (DJ-Free Ganeshotsav) हा मुद्दा चर्चेत आहे. गणेशोत्सवात डीजेच्या कर्कश आवाजाने होणाऱ्या ध्वनीप्रदुषणामुळे अनेकांना त्रास होतो. त्यामुळे पुण्याचे सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट (Vidyanand Bapat) यांनी या विरोधात आवाज उठवला. त्यांना यामुळे गणेशमंडळांच्या रोषाला सामोरं जावं लागत आहेत.
Manoj Jarange : 5 सप्टेंबरपर्यंत ग्रामपंचायत पातळीवर कुणबी नोंदी होणार ; मंत्री विखेंची मोठी घोषणा
त्यांच्यावर काल (3 सप्टेंबर) संतोष चव्हाण या तरुणाने हल्ला केला. पुणे पोलिसांनी संतोष चव्हाण याला अटकही केली. दरम्यान राजकीय नेत्यांनी बापटांवर झालेल्या हल्याचा निषेध केला आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पहिल्यांदाच या घटनेबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी विद्यानंद बापट यांनी मांडलेल्या मुद्द्यांचे समर्थन केले आहे.
सोलापुरात डीजेबंदी; उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
काय म्हणाले शरद पवार?
सण हा सुखद आणि लोकांना आनंद देणारा असला पाहीजे. डीजेचा आवाज आणि रस्त्यांवरील कार्यक्रम यांमुळे सणाचे गांभीर्य कमी होत आहे. विद्यानंद बापट यांनी मी ओळखत नाही. पण गणेशोत्सवाबद्दल त्यांनी मांडलेला मुद्दा योग्य आहे. उत्सवातील चुकीच्या गोष्टींवर बापट मत व्यक्त करत आहेत. त्यांच्या भुमिकेला माझं समर्थन आहे. कोणीतरी या संदर्भात मत व्यक्त केलं म्हणून त्यांच्यावर हल्ला करणं म्हणजे लोकशाहीवरच हल्ला आहे.
दादांच्या जाण्याचं राजकारण नको; रोहित पवार, सुप्रिया सुळेंना सुनेत्रा पवारांनी फटकारलं
पुण्याचे पोलिस आयुक्त आणि इतर घटकांनी या प्रकरणात अधिक लक्ष देण्याची गरज आहे. बापटांच्या हल्याचा निषेध करणाऱ्यांच्या मी सोबत आहे. हल्ले थांबायला पाहिजेत. नाहीतर सक्तीचे धोरण स्विकारले पाहीजे. सोलापुरने डीजेबाबत निर्णय घेतला, तसा निर्णय घेण्याची आवश्यकता आहे, असे शरद पवार म्हणाले.
दरम्यान बापटांवर झालेल्या हल्ल्यानंतर बापट अधिक सक्रिय झाले आहेत. ते डीजेमुक्त गणेशोत्सवाचा मुद्दा अधिक ठोसपणे मांडत आहेत.