Manoj Jarange : 5 सप्टेंबरपर्यंत ग्रामपंचायत पातळीवर कुणबी नोंदी होणार ; मंत्री विखेंची मोठी घोषणा
Manoj Jarange : मराठा आरक्षणासाठी 29 ऑगस्टपासून आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला आज राज्य सरकारचं शिष्टमंडळ
Manoj Jarange : मराठा आरक्षणासाठी 29 ऑगस्टपासून आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला आज राज्य सरकारचं शिष्टमंडळ आंतरवाली सराटी येथे दाखल झाले आहे. राज्य सरकारकडून आज जरांगे राज्याचे मंत्री विखे पाटील, उदय सामंत आणि प्रसाद लाडसह मकरंद आबा पाटील यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली.
यावेळी 30 लाख लोकांना डिजिटल प्रमाणपत्रं दिली असल्याची माहिती उदय सामंत यांनी दिली. तर 58 लाख नोंदींची प्रमाणपत्रं डिजिटाईज करा अशी मागणी यावेळी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी केली. तर अर्ज करतील त्यांना ग्रामपंचायत पातळीवर प्रमाणपत्रं मिळणार असल्याची माहिती मंत्री विखे पाटील यांनी मनोज जरांगेंना दिली. 5 सप्टेंबरपर्यंत ग्रामपंचायत पातळीवर कुणबी नोंदी केल्या जाणार असल्याची देखील माहिती विखे पाटील यांनी दिली. हैदराबाद गॅझेटनुसार कुणबी प्रमाणपत्र कधी देणार असा प्रश्न देखील जरांगे पाटील यांनी यावेळी राज्य सरकारच्या शिष्टमंडळाला विचारले. तसेच शिंदे समितीने 58 लाख नोंदी शोधल्या होत्या. कुणबी प्रमाणपत्रासाठी (Kunbi Certificate) उद्यापासून अर्ज करण्याचे मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला आवाहन केले आहे. प्रमाणपत्रासाठी नातं रक्ताचं नातं आणि कुळ तपासून अर्ज करा. सरकारच्या नियमावलीनुसार वंशावळ ग्राह्य धरली जात नाही असं देखील यावेळी जरांगे म्हणाले. तर आरक्षणाच्या शासन निर्णयात मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर बदल शक्य आहे असं यावेळी मंत्री विखे पाटील म्हणाले. तसेच कुणबी प्रमाणपत्रासाठी अर्ज करण्यात काही अडचणी आल्या तर जिल्हाधिकाऱ्यांना भेटण्याचे आवाहनही विखे पाटील यांनी केले.
प्रमाणपत्रासाठी प्रत्येक जिल्ह्यासाठी नोडल अधिकारी
तर कुणबी प्रमाणपत्रासाठी प्रत्येक जिल्ह्यासाठी नोडल अधिकारी असणार असल्याची माहिती मंत्री मकरंद पाटील यांनी दिली. हैदराबाद गॅझेटनुसार जात पडताळणी प्रमाणपत्रं कसं देणार असा प्रश्न जरांगे यांनी विचारल्यानंतर हैदराबाद गॅझेटनुसार प्रमाणपत्र देण्यात येत असल्याचा दावा सरकारकडून करण्यात आला. मात्र सर्व मागण्या मान्य झाल्यातरच आंदोलन थांबवणार अशी भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी घेतल्याने उपोषणाच्या सहाव्या दिवशी मनोज जरांगे पाटील उपोषण सोडणार का? याकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे.