मोठी बातमी! टेक ऑफ करताना उदय सामंतांच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड, पायलटच्या लक्षात आलं अन्यथा…

Uday Samant यांच्या हेलिकॉप्टरमध्ये टेक ऑफ करताना तांत्रिक बिघाड झाला. नागपूरवरून गडचिरोलीला जाताना हा प्रकार घडला.

Uday Samant

Uday Samant’s helicopter technical snag during takeoff pilot noticed it : राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हेलिकॉप्टरमध्ये टेक ऑफ करताना तांत्रिक बिघाड झाला. नागपूरवरून गडचिरोलीला जाताना हा प्रकार घडला. त्यामुळे उड्डाण रद्द करण्यात आलं. हा प्रकार पायलटच्या वेलीच लक्षात आल्याने मोठी दुर्घटना टळली आणि सुदैवाने कुणाला काहीही इजा झाली नाही. याबाबत स्वत: सामंत यांनी या बातमीला दुजोरा दिला.

नीट विद्यार्थी आंदोलकांना मोठा दिलासा! आंदोलनांतील गुन्हे मागे घेण्याची मुदत 31 मार्च 2027 पर्यंत वाढली

दरम्यान सामंत हे नागपूरवरून गडचिरोलीतील सुरजागड येथे पाहणीसाठी चालले होते. त्यावेळी ही घटना घडली. मात्र याची चौकशी केली जावी मागणी स्थानिक शिवसैनिकांनी केली आहे. या घटनेनंतर सामंत यांनी माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी या प्रकरणाची सविस्तर माहिती दिली. तसेच आता आपण गाडीने गडचिरोलीला जात असल्याचं देखील त्यांनी यावेळी सांगितलं.

बारामतीत आठ महिन्यांत तिसऱ्यांदा विमान कोसळले…

पुणे जिल्ह्यातील बारामती (Baramati) विमानतळावर पुन्हा एकदा विमान दुर्घटनेची (Aircraft Crash) घटना समोर आली आहे. विमानतळ परिसरात VT-SEX हे शिकाऊ विमान कोसळल्याची माहिती आहे. घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून संबंधित यंत्रणांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. विमानातील पायलट कॅप्टन चिराग शशिकांत दोईफोडे आणि कॅडेट अभिजीत जुंदरे यांना कोणतीही दुखापत झालेली नाही. अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू करण्यात आला आहे.

follow us