Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातात सर्व 242 प्रवाशांचा मृत्यू

Ahmedabad Plane Crash : गुजरातच्या अहमदाबाद येथील मेघानी नगर परिसरात 12 जून गुरुवारी दुपारी 1.30 च्या सुमारास एअर इंडियाचे प्रवासी विमान कोसळले (Ahmedabad Plane Crash) असून या विमान अपघातात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी (Vijay Rupani) यांच्यासह विमानातील सर्व प्रवाशांचा मृत्यू झाला असल्याचा दावा असोसिएडेट प्रेस या संस्थेने स्थानिक पोलिसांच्या हवाल्याने केला आहे. या विमानात 169 भारतीय नागरीक, 53 इंग्लंडचे नागरीक, 12 क्रु मेंबर्स, 07 पोर्तुगालचे तर 1 कॅनडाचा नागरीक असल्याची माहिती समोर आली आहे.
विमान अपघातात जखमी झालेल्या काही प्रवाशांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, परंतु त्यांची प्रकृती गंभीर आहे आणि त्यांना वाचवणे खूप कठीण असल्याची माहिती आयुक्त मलिक यांनी असोसिएडेट प्रेसला दिली आहे. घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे, परंतु ढिगारा आणि आगीची स्थिती पाहता परिस्थिती खूप आव्हानात्मक आहे. असं देखील आयुक्त मलिक म्हणाले.
BREAKING: There appear to be no survivors from Air India flight to London that crashed in Ahmedabad, city’s police chief tells AP. Follow for live updates. https://t.co/KYkwKeKhRN
— The Associated Press (@AP) June 12, 2025
माहितीनुसार, बोईंग 787-8 ड्रीमलाइनर या विमानात 242 लोक होते, ज्यात 230 प्रवासी आणि 12 क्रू मेंबर्स होते. ड्रीमलाइनर विमानने टेकऑफ केल्यानंतर लगेच कोसळला. याच विमानामध्ये कृ मेंबर असलेल्या अपर्णा महाडिक या राष्ट्रवादीचे खासदार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या भाचे सून असून या देखील याच विमानात होत्या. घटनास्थळी सध्या बचाव कार्य सुरु आहे. घटनास्थळी लष्कराचे 130 जवान बचावकार्याचे काम करत आहे. तर दुसरीकडे या अपघातामध्ये सर्व 242 लोकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. तर डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत 51 जणांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अपघाताची माहिती घेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि नागरी उड्डाण मंत्री राम मोहन नायडू यांना अहमदाबादला जाऊन विमान अपघातानंतर बाधितांना सर्वतोपरी मदत मिळावी याची खात्री करण्यास सांगितले आहे.
मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघात, माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचे निधन