Ahmedabad Plane Crash : अपघातग्रस्त विमानात माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी

Ahmedabad Plane Crash: गुजरातमधील अहमदाबाद येथे एअर इंडियाचे लंडनला जाणारे प्रवासी विमान कोसळले असून या विमानात 242 लोक होते अशी माहिती समोर आली आहे. अहमदाबाद विमानतळाजवळील (Ahmedabad Plane Crash) मेघानीनगरमध्ये (Meghaninagar) ही दुर्घटना घडली आहे. माहितीनुसार, बोईंग 787-8 ड्रीमलाइनर या विमानात 242 लोक होते, ज्यात 230 प्रवासी आणि 12 क्रू मेंबर्स होते. तर दुसरीकडे या विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी (Vijay Rupani) देखील असल्याची माहिती समोर आली आहे.
#Gujarat Ex-CM #VijayRupani, one of the passengers in #AirIndia #planecrash in #Ahmedabad #absoluteindianews pic.twitter.com/27ZDB3ZhnY
— Absolute India News (@AbsoluteIndNews) June 12, 2025
माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी विमानात दुसऱ्या रांगेत बसले होते. सोशल मीडियावर त्यांचे तिकीट देखील व्हायरल होत आहे. मात्र माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी सध्या कोणत्या अवस्थेत आहे याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
अपघात कधी झाला?
समोर आलेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी (12 जून) अहमदाबाद विमानतळाजवळ एअर इंडियाचे विमान टेकऑफ झाल्यानंतर लगेच कोसळले. या दुर्घटनेनंतर अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि मदत आणि बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू आहे.
An aircraft has crashed near Forensic Cross Road in Meghaninagar, Ahmedabad, Gujarat. Police and fire brigade teams are rushing to the scene at IGB Ground. More details awaited.@NewIndianXpress @santwana99 @jayanthjacob
#Ahmedabad #PlaneCrash #BreakingNews pic.twitter.com/VUGKJ4psgv— Dilip Kshatriya (@Kshatriyadilip) June 12, 2025
Pune Sassoon Hospital : पुण्यातील ससून रूग्णालयातील डॉक्टरचा मृत्यू, धक्कादायक कारण…