Pune Sassoon Hospital : पुण्यातील ससून रूग्णालयातील डॉक्टरचा मृत्यू, धक्कादायक कारण…

Sassoon Hospital Dr Nitin Abhiwant Death While Trekking : पुण्यातील (Pune News) ससून रुग्णालयातील फिरायला गेलेल्या डॉक्टरचा मृत्यू झालेला (Dr Nitin Abhiwant Death) आहे. हिमालयातील बुरानवेलीमध्ये श्वास घेताना त्रास झाल्यामुळे या डॉक्टरचा मृत्यू झालाय. नितीन अभिवंत, असं या डॉक्टरचं नाव असल्याची माहिती मिळतेय. डॉ. नितीन अभिवंत पुण्यातील ससून हॉस्पिटलमधील ( Sassoon Hospital) मनोविकृतीशास्त्र विभागाचे प्रमुख होते. त्यांचा हिमालयातील ट्रेकदरम्यान मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.
ट्रेकिंगची प्रचंड आवड
डॉ. नितीन अभिवंत हे 42 वर्षाचे होते. त्यांना ट्रेकिंगची प्रचंड आवड असल्याचं सांगितलं जातंय. ट्रेकिंगसाठी ते हिमालयात गेले होते. तेथे ट्रेकिंगदरम्यान श्वासोच्छवासात अडथळा आला. त्यांना धाप लागली अन् या घटनेतच त्यांचा मृत्यू झालाय. डॉ. नितीन अभिवंत यांच्या मृत्यूमुळे सहकारी, मित्र, नातेवाईक आणि कुटुंबीयांकडून शोक व्यक्त केला जात आहे. त्यांच्या पश्चात पत्नी रुपाली आणि सात वर्षीय मुलगा आहे. त्यांची पत्नी बीजे महाविद्यालयात PSM विभागात सहाय्यक प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहे.
मोठी बातमी! प्रभाग रचना सप्टेंबरपर्यंत पूर्ण होणार; निवडणूक आयोगाने वेळापत्रक जाहीर केले
मनोविकृतीशास्त्र विभागामध्ये कार्यरत
डॉ. अभिवंत दहा वर्षांपासून ससूनमध्ये कार्यरत होते. सोलापुरमधील पाच वर्षांच्या सेवेनंतर डॉ. अभिवंत 2014 पासून ससून रुग्णालयातील मनोविकृतीशास्त्र विभागामध्ये कार्यरत असल्याची माहिती मिळतेय. महाविद्यालयीन मित्रांसह डॉ. नितीन अभिवंत शनिवारी मुंबईहून हिमालयातील बुरान व्हॅली येथे ट्रेकिंगसाठी गेले होते. तर सोमवारी सकाळी त्यांनी गिर्यारोहणास सुरुवात केली होती. त्यानंतर अवघ्या अर्ध्या तासामध्ये त्यांना धाप लागली अन् घाम फुटला.
स्वसरंक्षणासाठी आम्हाला शस्त्रपरवाना द्या! मेंढपाळांची शिंदेंकडे मागणी, प्रकरण नेमकं काय?
सोबत असलेल्या दोन डॉक्टर मित्रांनी त्यांच्यावर प्रथमोपचार करत जवळच्या रूग्णालयात दाखल केले. परंतु तोपर्यंत डॉ. नितीन अभिवंत यांचा मृत्यू झाला होता. मित्रांचे शर्थीचे प्रयत्न तोकडे पडले. डॉ. अभिवंत यांच्या मृत्यूनंतर कुटूंब, मित्र आणि सहकारी वर्ग हळहळ व्यक्त करीत आहे.