रश्मिकानंतर आता रतन टाटांचा डीपफेक व्हिडीओ; प्रकल्पासाठी पैसे जमा करण्याचं आवाहन

रश्मिकानंतर आता रतन टाटांचा डीपफेक व्हिडीओ; प्रकल्पासाठी पैसे जमा करण्याचं आवाहन

Ratan Tata : मागील काही दिवसांपासून देशातील दिग्गज नेते, अभिनेत्रींसह उद्योजकांचे डीपफेक व्हिडिओ व्हायरल होत असल्याचं समोर येत आहे. याआधी दाक्षिणात्या अभिनेत्री रश्मिका मंदाना नंतर कतरिना कैफ आणि आता उद्योगपती रतन टाटा (Ratan Tata) यांचा डीपफेक व्हिडिओ व्हायरल होतोयं. व्हिडिओच्या माध्यमातून रतन टाटा आपल्या प्रकल्पासाठी पैसे जमा करण्याचं आवाहन करीत असल्याचं दिसून येत आहे.

विरोधक तीन राज्यांसारखेच पत्रकार परिषदेतही झोपले; देवेंद्र फडणवीसांचा घणाघात

उद्योजक रतन टाटा यांनी लोकांना एका प्रोजेक्टमध्ये पैसे जमा करण्यास सांगितल्याचा डीपफेक व्हिडिओ समोर आला आहे. त्यानंतर आता रतन टाटा यांनी नागरिकांना सतर्क राहण्याबाबत आवाहन करण्यात आलं आहे. रतन टाटा व्हिडिओमध्ये म्हणतात, मला रोज लाखो मेसेज येतात ज्यात मला तुमची मदत करायला सांगतो. माझी मॅनेजर सोना अग्रवाल यांच्यासोबत मी एक प्रोजेक्ट सुरू केला. प्रोजेक्टमध्ये येण्यासाठी. तुम्हाला किमान रक्कम जमा करणे आवश्यक असल्याचं डीपफेक व्हिडिओमध्ये दाखवण्यात आलं आहे.

‘…आता खासदार होण्यासाठी दलित होतात’; कन्हैय्या कुमारांचा रोख कुणाकडे?

काही दिवसांपासून डीपफेकच्या गैरवापराबद्दल सर्वच स्तरावरुन चिंता व्यक्त केली जात आहे. डीपफेकला अनेक अभिनेते-अभिनेत्री आणि राजकीय नेते देखील बळी पडले आहेत. माजी क्रिकेटपट्टू सचिन तेंडूलकरची लेक सारा तेंडूलकर आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना डीपफेकच्या जाळ्यात येताच पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार अॅक्शन मोडमध्ये उतरल्याचं पाहायला मिळालं आहे. डीपफेकला आळा घालण्यासाठी मोदी सरकारने तत्काळ बैठक घेत उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला. डीपफेकला आळा घालण्यासाठी लवकरच नियम लागू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचंही केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केलं.

‘INDIA’ आघाडीत मिठाचा खडा! आधी जागा वाटप, नंतरच बैठक; अखिलेश यादव आक्रमक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा देखील डीपफेक तयार केला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी G20 वर्च्युअल समिटमध्ये एआयच्या नकारात्मक वापराबाबत चिंता व्यक्त केली होती. ‘डीपफेक’मुळे मोठे संकट ओढवू शकते, असा इशारा पंतप्रधान मोदींनी गेल्या शुक्रवारी दिला होता. डीपफेक समाजात असंतोष निर्माण करू शकतो. त्यांनी प्रसारमाध्यमांना जनजागृती करण्याचे आणि त्याच्या गैरवापराबद्दल लोकांना शिक्षित करण्याचे आवाहन केले. या मुद्द्यावर सरकारने नुकतीच कंपन्यांना नोटीस बजावली.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube