‘…आता खासदार होण्यासाठी दलित होतात’; कन्हैय्या कुमारांचा रोख कुणाकडे?

‘…आता खासदार होण्यासाठी दलित होतात’; कन्हैय्या कुमारांचा रोख कुणाकडे?

Kanhaiya Kumar : आधी जात लपवावी लागत होती आता खासदार होण्यासाठी दलित होतात, या शब्दांत काँग्रेस नेते कन्हैय्या कुमार (Kanhaiya Kumar) यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज अमरावतीत बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आलं. आमदार यशोमती ठाकूर यांच्यासह काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन केलं आहे. यावेळी आयोजित कार्यक्रमाला कन्हैय्या कुमार यांनी हजेरी लावली. या कार्यक्रमात ते बोलत होते. कन्हैय्या कुमार यांनी खासदार नवनीत राणा यांचं नाव न घेता निशाणा साधला आहे.

खुशखबर! ऋषभ पंत पुनरागमन करणऱ्यासाठी सज्ज, लवकरच होणार टीम इंडियामध्ये एंट्री

पुढे बोलताना कन्हैय्या कुमार म्हणाले, ‘डॉ. बाबासाहेब आंबडेकरांचा विजय असो…; मला मराठी येत नाही पण समजते मला फक्त एवढीच मराठी येते. बाबासाहेबांचं नाव घेऊन आज काय सुरु आहे. त्यांचे विचार कसे पुढे नेले पाहिजेत. जगभरात बाबाहेबांना अभिवादन केलं जातं. त्यांच्या विचारांवर चर्चा केली जाते. बाबासाहेबांना देवासारखं पूजतात. ज्यांनी मानवतेला महत्व दिलं समाजाला अस्थापित केलं त्यांची फक्त आजच आठवण करणं योग्य की? पूर्ण वर्षभर त्यांच्यावर विचारांवर चालणं हा प्रश्न आपण स्वत;ला विचारायला हवा. आधी दलितांना जात लपवावी लागत होती आज खासदार होण्यासाठी दलित बनतात, खासदार होण्यासाठी खोटा जातीचा दाखला बनवत असल्याचा आरोपही कुमार यांनी नवनीत राणा यांच्यावर केला आहे.

Maratha Reservation: आरक्षण मिळू द्या, याच्यात किती दम आहे तो बघायचाय; जरांगेंचे भुजबळांना पुन्हा चँलेज

तसेच आजच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांनी बाबासाहेबांना श्रद्धांजली वाहून यशोमती ठाकूरांचे यांचे आभारही मानले आहेत. 70 वर्षांत ही यात्रा आम्ही पाहिली आहे. जातीच्या निर्मूलनवर बोलणारेही आज बाबासाहेबांपुढे झुकतात. हे असंच सुरु राहिल किंवा हे असंच होतं का हा प्रश्न आहे. आधी असं नव्हतं हे असंच असायला हवं अस पण नकोयं. अधिकारांची लढाई सोपी नसते, स्वप्नात देव आले आणि म्हणाले उद्या तुमचं भाग्य बदलेलं असं नसतं. ही भूमी समाजसेवक, संतांची, वीरांगणांची आहे. या भूमीत छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, संत गाडगे बाबा, बाबासाहेब आंबेडकर, शाहु महाराज नसते तर पुरोगामी विचारही नसते, असंही ते म्हणाले आहेत.

दरम्यान, नवनीत राणा यांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे अनुसूचित जातीचा दाखला मुंबई उपनगर उपजिल्हाधिकाऱ्यांकडून मिळवला असल्याचा आरोप करत शिवसेनेचे नेते आनंदराव अडसूळ यांनी मुंबई उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी करत असताना मुंबई उच्च न्यायालयाने नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र रद्द केले होते. त्यावरुन कन्हैय्या कुमार यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube