खुशखबर! ऋषभ पंत पुनरागमन करणऱ्यासाठी सज्ज, लवकरच होणार टीम इंडियामध्ये एंट्री

  • Written By: Published:
खुशखबर! ऋषभ पंत पुनरागमन करणऱ्यासाठी सज्ज, लवकरच होणार टीम इंडियामध्ये एंट्री

Rishabh Pant Fitness Update: टीम इंडियाचा दमदार यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतने (Rishabh Pant) त्याच्या फिटनेसबाबत एक मोठे अपडेट दिले आहे, ते पाहून त्याचे चाहते नक्कीच खूप खूश होतील. आता पंतचा फिटनेस पाहता तो लवकरच क्रिकेटमध्ये पुनरागमन करू शकतो आणि 2024 वर्ष सुरू होताच तो पुन्हा क्रिकेटच्या मैदानावर दिसू शकतो. पंतने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो जिममध्ये वर्क आऊट करतांना दिसत आहे.

Sanjay Raut : उद्धव ठाकरे PM पदाचा चेहरा? राऊतांनी ‘सस्पेन्स’ ठेवला कायम 

पंतने फिटनेस दाखवून सर्वांना खूश केले

खरंतर, 2023 हे वर्ष सुरू होण्यापूर्वीच ऋषभ पंतसाठी खूप वाईट गेले होते. नवीन वर्ष येण्याच्या दोनच दिवस आधी म्हणजे 30 डिसेंबर 2022 रोजी त्याच्या कारचा एक अतिशय धोकादायक अपघात झाला. त्यामुळ त्यांच्या कारलाही आग लागली. वास्तविक त्याची कार दुभाजकावर आदळल्यानं ऋषभ पंत गंभीर जखमी झाला होता. सुरुवातीला असे वाटत होते की पंतला क्रिकेटमध्ये परतणे कठीण होईल, पण तसे नाही. या कार अपघातानंतर पंत याच्यावर शस्त्रक्रिया कऱण्यात आली…. यानंतर काही दिवसांपूर्वी पंत पहिल्यांदाच कोणत्याही आधाराशिवाय चालताता दिसला होता. अवघ्या एका वर्षात त्याने क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्याची क्षमता निर्माण केली आहे.

Shriya Saran : पिवळा ड्रेस, मोकळे केस…. श्रिया सरनच्या कातिल अदा 

2023 मध्ये पंत क्रिकेटपासून पूर्णपणे दूर राहिला. त्याला भारतात ऑस्ट्रेलियाविरुद्धची कसोटी मालिका, आयपीएल 2023, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल, आशिया चषक आणि एकदिवसीय विश्वचषक देखील मुकावे लागले होते, परंतु आता पंत कदाचित 2024 मध्ये अनेक स्पर्धांना मुकावे लागणार नाही. त्याचा लेटेस्ट फिटनेस व्हिडिओ पाहता तो लवकरच क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार असल्याचे दिसते. सोशल मीडिया अकाउंटवरून शेअर केलेल्या या फिटनेस व्हिडिओमध्ये पंत जिममध्ये मेहनत करताना दिसत आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये पंतने लिहिले आहे की, ‘मी लवकरच परत येत आहे.

लवकरच क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार

मात्र, पंतच्या पुनरागमनाबद्दल बोलायचे झाले तर, तो भारतीय क्रिकेट संघात कधी परतणार याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही, मात्र पंत आयपीएल 2024 मध्ये खेळताना दिसणार आहे, याची ग्वाही त्याच्या टीम दिल्ली कॅपिटल्सचे संचालक सौरव यांनी दिली आहे. गांगुलीने काही आठवड्यांपूर्वी पीटीआयला सांगितले होते की पंत आता ठीक आहे आणि तो आयपीएलमध्ये खेळेल आणि दिल्ली कॅपिटल्सचे कर्णधारही असेल.

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube