हॉटेल व्यावसायिक जया शेट्टी हत्याप्रकरण; छोटा राजनला जन्मठेपेची शिक्षा
Chhota Rajan Jailed For Life In Mumbai Hotelier Jaya Shetty Murder Case: अंडरवर्ल्ड डॉन राजेंद्र सदाशिव निकाळजे उर्फ छोटा राजन (Chhota Rajan) याला आता दुसऱ्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा ठोठाविण्यात आली आहे. हॉटेल व्यावसायिक जया शेट्टी या महिलेची हत्या केल्याप्रकरणी छोटा राजन याला गुरुवारी जन्मठेपेची शिक्षा व दहा लाखांचा दंड ठोठाविण्यात आला आहे. मुंबई सत्र न्यायालयातील (Mumbai Session Court) विशेष सीबीआय (CBI) कोर्टाचे न्यायाधीश ए. एम. पाटील यांनी हा निकाल दिला आहे. पत्रकार जेडे यांच्या हत्येप्रकरणी छोटा राजनला जन्मठेपेची शिक्षा झालेली असून, तो सध्या दिल्लीतील तिहार तुरुंगात आहे.
मी तुमच्या नोटीसीला भीक घालत नाही; शंभूराज देसाईंच्या अल्टिमेटवर सुषमा अंधारेंचं प्रत्युत्तर
जया शेट्टी या महिलेकडे छोटा राजन याने रवी पुजारीमार्फत 2001 मध्ये 50 कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. परंतु महिलेने खंडणी देण्यास नकार दिल्यानंतर तिच्या हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात महिलेवर गोळ्या झाडणाऱ्या अजित मोहिते, प्रमोद धोंडे, राहुल पानसरे या दोघांना 2013 मध्येच दोषी ठरवून शिक्षा झाली होती. त्यानंतर अकरा वर्षानंतर मुख्य आरोपी छोटा राजन याला जन्मठेपेची शिक्षा झाली आहे.
सेंट्रल मुंबईतील गामदेवी येथे जया शेट्टी यांचे गोल्डन क्राऊन हॉटेल होते. छोटा राजन याने हस्तकामार्फत खंडणी वसुलीसाठी जया शेट्टी यांना फोन केला होता. परंतु खंडणी मिळत नसल्याने छोटा राजनच्या दोन गुंडांनी 4 मे 2001 मध्ये हॉटेलमध्ये घुसून शेट्टी यांची गोळ्या झाडून हत्या केली होती. छोट्या राजनकडून धमक्या येत असल्याने या महिलेने पोलिसांकडून तक्रार केली होती. पोलिसांनी त्याला सुरक्षा पुरविली होती. दोन महिन्यापूर्वी या महिलेची सुरक्षा काढून घेण्यात आली. त्यानंतर ही हत्या झाली होती.
व्यवस्थापकामुळे पकडले आरोपी
जया शेट्टी यांच्यावर गोळ्या झाडल्यानंतर हॉटेलचा व्यवस्थापक व कर्मचाऱ्यांनी धैर्य दाखवत हत्या करणाऱ्यांची पाठलाग केला. त्याली एकाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. या आरोपीकडून झालेल्या चौकशीनंतर या पाठीमागे छोटा राजन व त्याचे हस्तक असल्याचे उघडकीस आले. त्यानंतर अजय मोहिते, प्रमोद धोंडे आणि राहुल पानसरे या दोघांना दोषी ठरविले होते.