‘इंडियाला’ बहुमत मिळाल्यास 48 तासांत पंतप्रधान बनणार अन् एनडीएच्या घटक पक्षांना…; कॉंग्रेसचं नेत्याचं मोठं विधान

‘इंडियाला’ बहुमत मिळाल्यास 48 तासांत पंतप्रधान बनणार अन् एनडीएच्या घटक पक्षांना…; कॉंग्रेसचं नेत्याचं मोठं विधान

Jairam Ramesh On Loksabha Election : ४ जून रोजी लोकसभा निवडणुकीचा (Loksabha Election) निकाल जाहीर होणार आहे. या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधक विजयाचा दावा करत आहेत. अशातच आता कॉंग्रेस नेते जयराम रमेश (Jairam Ramesh) यांनीही असंच विधान केलं. इंडिया आघाडीला (India Alliance) बहुमत मिळाल्यास ४८ तासांत पंतप्रधान पदाचा उमेदवार निश्चित करून शपथ दिली. इंडिया आघाडीचं सरकार सत्तेत येत असले तर एनडीएमधील (NDA) इतर पक्षही आमच्यासोबत येऊ शकतात, असा दावा त्यांनी केला.

मोदींचं बोलणं ऐकून हसू येतं; महात्मा गांधीवर केलेल्या विधानावरुन खर्गेंचा मोदींना टोला 

लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यातील प्रचाराच्या शेवटच्या दिवशी जयराम रमेश यांनी पीटीआयला मुलाखत दिली. यामुलाखतीत बोलतांना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. यावेळी त्यांनी लोकसभा निवडणुकीवरही भाष्य केलं. लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला बहुमत मिळाल्यास ४८ तासांत पंतप्रधान पदाचा उमेदवार निश्चित करून शपथ दिली जाईल. आघाडीमध्ये ज्याला जास्त जागा मिळतील त्यांचीच पंतप्रधानपदासाठी दावेदारी अधिक असेल असंही त्यांनी स्पष्ट केलं.

भाविकांनी भरलेली बस खोल दरीत कोसळली, 21 ठार तर 47 जण गंभीर 

इंडिया आघाडीला 272 पेक्षा जास्त जागा मिळतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
जयराम रमेश पुढे म्हणाले की, इंडिया आघाडीचं सरकार सत्तेत येत असले तर एनडीएमधील इतर पक्ष आमच्यासोबत येऊ शकतात. त्यांना आघाडीत घ्यायचं की, नाही, याचा निर्णय काँग्रेस हायकमांड घेईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

इंडिया आघाडीला स्पष्ट आणि निर्णायक बहुमत मिळणार
सहा टप्प्यातील राजकीय परिस्थितीबाबतही त्यांना विचारणा करण्यात आली. त्यावर त्यांनी मी आकडेमोड करण्याच्या भानगडीत पडणार नाही. मात्र, इंडिया आघाडीला स्पष्ट आणि निर्णायक बहुमत मिळणार हे निश्चित आहे. 273 हे स्पष्ट बहुमत आहे. पण निर्णायक नाही. जेव्हा मी स्पष्ट आणि निर्णायक बहुमताबद्दल बोलतो, तेव्हा माझा अर्थ 272 पेक्षा जास्त जागा मिळतील असा आहे. 2004 चा निकाल 2024 मध्ये पुन्हा लागणार आहे. राजस्थान, कर्नाटक, तेलंगणा आणि महाराष्ट्रात काँग्रेसला चांगल्या जागा मिळतील, असा दावाही त्यांनी केला.

निवडणुकीनंतर नितीशकुमार आणि टीडीपीचे अध्यक्ष एन. चंद्राबाबू नायडूंसारख्या नेत्यांसाठी इंडिया आघाडीचे दरवाजे खुले राहणार का? या प्रश्नाला उत्तर देताना जयराम रमेश म्हणाले की, नितीशकुमार हे पलटी मारण्यात माहीर आहेत. 2019 मध्ये नायडू काँग्रेससोबत होते. ज्या पक्षांमध्ये प्रामाणिकपणा आणि माणुसकी असेल त्यांना इंडिया आघाडीत स्थान दिले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज