मोदींचं बोलणं ऐकून हसू येतं; महात्मा गांधीवर केलेल्या विधानावरुन खर्गेंचा मोदींना टोला
Mallikarjun Kharge : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांचं बोलणं ऐकून हसू येत असल्याचा खोचक टोला काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी लगावलायं. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत महात्मा गांधींबद्दल विधान केलं होतं. पंतप्रधान मोदींच्या विधानानंतर त्यांच्यावर काँग्रेस नेत्यांनी हल्लाबोल चढवला होता. त्यावर बोलताना मल्लिकार्जून खर्गेंनी भाष्य केलंय.
पुण्यातील हिंजवडी आयटी पार्कमधील 37 आयटी कंपन्यांनी गाशा गुंडाळला, काय आहे नेमकं प्रकरण?
खर्गे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महात्मा गांधीबद्दल कधीच वाचलं नसेल. त्यामुळे त्यांना संविधानसंदर्भातही काहीच माहिती नसेल. मला ‘गांधी’ चित्रपट पाहून महात्मा गांधींबद्दल माहिती मिळाली असं नरेंद्र मोदी म्हणाले होते. पंतप्रधान मोदी जे बोलतात ते ऐकून मला हसू येतं, कदाचित नरेंद्र मोदींनी गांधीजींबद्दल कधीच वाचले नसावं, अशी टोलेबाजी खर्गे यांनी केलीयं.
बदलेले ब्लड सॅम्पल आरोपी मुलाच्या आईचं? ढसाढसा रडणाऱ्या शिवानी अग्रवाल बेपत्ता
तसेच महात्मा गांधीजींना संपूर्ण जग ओळखतं, जगात विविध ठिकाणी त्यांचे पुतळे आहेत. नरेंद्र मोदींना महात्मा गांधींबद्दल माहिती नसेल तर त्यांना राज्यघटनाही कळणार नाही. महात्मा गांधीजींचा अहिंसेवर विश्वास होता, त्यांनी कधीही कोणाचा द्वेष केला नाही. पण नरेंद्र मोदी फक्त द्वेषावर बोलतात, त्यांच्या प्रत्येक गोष्टीतून द्वेष दिसून येत असल्याचंही खर्गे म्हणाले आहेत.
काय म्हणाले होते पंतप्रधान मोदी?
ज्यावेळी महात्मा गांधी यांच्यावर पहिला चित्रपट बनला त्यावेळी जगात महात्मा गांधी यांच्याबद्दल कुतूहल निर्माण झालं. याआधी मात्र त्यांना कुणीही ओळखत नव्हतं. महात्मा गांधी यांचे विचार जगभरात पोहोचविण्यासाठी मागील 75 वर्षांच्या काळात काहीच झांल नाही. महात्मा गांधी एक महान व्यक्तिमत्व होते. त्यांना आपण जगभरात ओळख मिळवून द्यायला हवी होती. ही आपली जबाबदारी होती. मात्र आपण त्यात अपयशी ठरलो. त्यांना कुणीच ओळखत नव्हतं. ज्यावेळी पहिल्यांदा महात्मा गांधी यांच्यावर चित्रपट तयार झाला त्यावेळी जगभरात कुतूहल निर्माण झालं की महात्मा गांधी नेमके कोण आहेत. महात्मा गांधी यांची जगात ओळख निर्माण करून देण्यासाठी आपण मागील 75 वर्षात काहीच केलं नसल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते.