बदलेले ब्लड सॅम्पल आरोपी मुलाच्या आईचं? ढसाढसा रडणाऱ्या शिवानी अग्रवाल बेपत्ता

बदलेले ब्लड सॅम्पल आरोपी मुलाच्या आईचं? ढसाढसा रडणाऱ्या शिवानी अग्रवाल बेपत्ता

Pune Car Accident : पुणे अपघातातील धक्केदायक खुलासे काही थांबायचं नाव घेत नाहीत. मुलाच्या जमीन घटनेने पेट घेतलेलं हे प्रकरण रोज एक नवं वळण घेतंय. ब्लड सॅम्पल फेरफार प्रकरण गाजत असताना आता यामध्ये नवीन धक्कादायक माहिती समोर आलीये. (Pune Accident) जे ब्लड सॅम्पल बदललं ते कुणाचं आहे याची चर्चा रंगली असतानाच ते दुसरं-तिसरं कुणाचं नसून आरोपी मुलाच्या आईचेच असल्याची शंका उपस्थित करण्यात आली आहे. (Blood sample) धक्कादायक माहिती समोर आलीय.

 

पोलिसांना तपास करताना वैद्यकीय तपासणीसाठी ब्लड सॅम्पल आवश्यक होते. त्यामुळे आरोपी मुलाचे ससून रुग्णालयातून रक्ताचे नमुने घेण्यात आले. मात्र, पोलिसांना नमुने देताना ससूनमधील डॉक्टरांनी त्यामध्ये फेरफार केल्याचं उघड झालं. त्या प्रकरणात डॉक्टरांसह ससूनमधील एक शिपायी अटक आहे. रक्ताचे नमुने दिले होते. दरम्यान अनेक दिवस जे रक्त पोलिसांना देण्यात आले होते ते कुणाचे आहे हा प्रश्न होता. अखेर या प्रकरणाच्या चौकशीसाठी नेमलेल्या समितीने अहवाल दिला आहे. त्यामध्ये मुलाच्या रक्ताचे नमुने हे एका महिलेचे असल्याचं समोर आलं आहे.

Pune Car Accident : ब्लड सॅम्पल बदलणं भोवलं! दोन डॉक्टर अन् शिपायाचं निलंबन

या घटनेमध्ये ब्लड रिपोर्ट खूप महत्वाचा आहे. तो पॉझिटीव असेल तरच आरोपी तरूणाचा खटला मजबूत होऊ शकतो. परंतु, या तरुणाला तब्बल नऊ तासानंतर ससून रुग्णालयात नेण्यात आलं. त्यानंतर येथे याने मद्य घेतलं आहे की नाही, हे तपासण्यासाठी त्याच्या रक्ताचे नमुने घेतले. मात्र, त्यानंतर येथे धक्कादायक घडामोडी घडल्या. येथील डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हरलोर या दोन वरिष्ठ डॉक्टरांनी मुख्य आरोपी असलेल्या अल्पवयीन मुलाच्या ब्लड सॅम्पलची अदलाबदल केल्याचं उघड झालं.

Pune Car Accident : तरच सगळी नावे समोर येतील; अपघात प्रकरणात प्रकाश आंबेडकरांची एन्ट्री

पोलिसांकडून मुलाची आई शिवानी अग्रवाल यांची देखील चौकशी होणार असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, सध्या शिवानी अग्रवाल बेपत्ता असल्याची चर्चा आहे. ड्रायव्हरला धममकावल्याप्रकरणी क्राइम ब्रँच टीमकडून शिवानी अग्रवाल यांचाही तपास होणार आहे. त्यामुळे, पोलिसांचे पथक त्यांना ताब्यात घेईल, या भीतीने त्या सध्या बेपत्ता आहेत. तर, शिवानी अग्रवाल यांचा फोन देखील बंद आहे. त्यामुळे, मुलाची आई व विशाल अग्रवाल यांच्या पत्नी नेमकं कुठं गायब झाल्या, असा प्रश्न आता पडला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज