मोदी भीतीपोटी कट कारस्थान रचताहेत, ते इंडिया आघाडीला घाबरले; प्रणिती शिंदेंचा हल्लाबोल
Praniti Shinde On PM Modi : लोकसभा निवडणुका (Lok Sabha elections) अवघ्या काही दिवसांवर आल्या आहेत. सर्वच पक्षांनी आणि उमदेवारांनी आता प्रचाराला सुरूवात केली. सत्ताधारी आणि विरोधक यांच्याकडून आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहे. दरम्यान, आता सोलापूर लोकसभा (Solapur Lok Sabha) मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांनी भाजपसह पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली. ‘अब की बार, चारसौ पार’चा नारा देणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) इंडिया आघाडीमुळं (India Alliance) घाबरले असल्याची टीका शिंदेंनी केली.
गोविंदा खोटारडे, त्यांचे दाऊदशी संबंध…; भाजप नेते राम नाईकांचे टीकास्त्र
सोलापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे प्रचार करत आहेत. त्यांनी अक्षरश: मतदारसंघ पिंजून काढला आहे. शुक्रवारी सकाळी शिंदे यांनी अक्कलकोट तालुक्यात जाऊन कॉर्नर बैठक घेतली. यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली. प्रणिती शिंदे म्हणाल्या की, ‘अब की बार, चारसौ पार’चा नारा देणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी इंडिया आघाडीमुळं घाबरले आहेत. त्यामुळेच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना रातोरात अटक केली. काँग्रेस पक्षाची बँक खाती गोठवण्यात आली आहेत. नरेंद्र मोदी केवळ भीतीपोटी कट कारस्थान रचत आहेत, असा प्रणिती शिंदे यांनी केला.
ओबीसी बहुजन पार्टीकडून 9 उमेदवारांची यादी जाहीर, कोणत्या मतदारसंघातून कोण लढणार ?
स्थानिक विकासाच्या मुद्द्यावर लक्ष केंद्रित करून आमदार प्रणिती शिंदे भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करताना दिसल्या. त्या म्हणाल्या की, खासदार स्वामींनी हैद्रा गावासाठी किंवा अक्कलकोट तालुक्यासाठी केलेले एक काम दाखवा, मी ताबडतोब खाली बसेन असं आव्हान करत मला देखील श्रद्धेने मतदान करा, असं प्रणिती शिंदे म्हणाल्या.
राम सातपुतेंवर टीका करणं टाळलं
या निवडणुकीत आमदार प्रणिती शिंदे आणि आमदार राम सातपुते हे दोन्ही उमेदवार एकमेकांवर जोरदार टीका करत आहेत. मात्र अक्कलकोट तालुक्यातील निवडणूक प्रचारादरम्यान आमदार प्रणिती शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना भाजपचे उमेदवार राम सातपुते यांच्यावर टीकेचा ब्र शब्दही काढला नाही.