गोविंदा खोटारडे, त्यांचे दाऊदशी संबंध…; भाजप नेते राम नाईकांचे टीकास्त्र
Ram Naik on Govinda : बॉलिवूड अभिनेता गोविंदाने (Actor Govinda) दोनच दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यांच्या पक्षप्रवेशानंतर ठाकरे गटाकडून सातत्याने टीका केली जाते. आता भाजप नेते राम नाईक (Ram Naik) यांनीही गोविंदा यांच्यावर मोठा आरोप केला. गोविंदा खोटारडा आहे, गोविंदाचे दाऊदशी संबंध असल्याचा आरोप नाईक यांनी केला.
ओबीसी बहुजन पार्टीकडून 9 उमेदवारांची यादी जाहीर, कोणत्या मतदारसंघातून कोण लढणार ?
गोविंदा यांनी 14 वर्षांनंतर पुन्हा एकदा राजकीय इनिंगला सुरूवात केली. त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर आज राम नाईक यांनी मीडियाशी संवाद केला. यावेळी त्यांनी गोविंदाच्या पक्षप्रवेशावर भाष्य केलं. नाईक म्हणाले की, मी गोविंदाला चांगला ओळखतो. त्यांनी माझ्या विरोधात निवडणूक लढवली होती आणि माझा पराभव केला होता. त्यांच्याशी कधी मैत्री होऊच शकत नाही. गोविंदा खोटारडा आहे. त्यांनी यापूर्वी दोन ते तीन वेळा आपण राजकारणातून निवृत्ती घेत असल्याचं सांगितलं. त्यांनी राजकारणात कधीच परतणार नाही, अस सांगितलं. मात्र, आता ते परतले आहेत, असा टोला राम नाईक यांनी लगावला.
अमरावतीत महायुतीचं टेन्शन वाढलं! नवनीत राणांविरोधात ‘प्रहार’कडून दिनेश बूब रिंगणात
गोविंदाने निवडणुकीत दाऊदची मदत घेतल्याच्या माझ्या आरोपावर मी ठाम आहे. माझ्या आरोपांवर कोणीही आक्षेप घेतला नाही. तो आरोप मी माझ्या पुस्तकातही नमूद केला आहे, मात्र ते आरोप कोणीही खोडले नाहीत, असं राम नाईक म्हणाले.
भाजपची प्रतिक्रिया पाहण्यासारखी – राऊत
गोविंदाच्या शिंदे गटातील प्रवेशावरून संजय राऊत यांनीही भाजपवर निशाणा साधला आहे. गोविंदा काँग्रेसकडून निवडणूक लढवत असताना भाजपचे उमेदवार राम नाईक यांनी त्याच्यावर गंभीर आरोप केले होते. आता तोच गोविंदा भाजपच्या मित्र मंडळात सामील झाला आहे. बघू, आता यावर भाजपची प्रतिक्रिया काय असेल, असं राऊत म्हणाले.
गोविंदा मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची माहिती आहे. तर ठाकरे गटाने आधीच यापूर्वीच अमोल कीर्तिकर यांची उमेदवारी उत्तर पश्चिम मतदारसंघातून जाहीर केली आहे. दरम्यान, आता शिवसेनेने गोविंदा यांना तिकीट दिल्यास या मतदारसंघात गोविंदा विरुद्ध अमोल कीर्तिकर असा सामना होईल.