PNB Scam Case मधील महिला आरोपीला पाच वर्षांनी जामीन मंजूर

PNB Scam Case मधील महिला आरोपीला पाच वर्षांनी जामीन मंजूर

मुंबई : पंजाब नॅशनल बँक (PNB) प्रकरणात (Punjab National Bank Scam Case) अटकेमध्ये असलेल्या एकमेव महिला आरोपीला पाच वर्षांनी जामीन मिळालाय. नीरव मोदीच्या (Nirav Modi) कंपनीची माजी पदाधिकारी कविता मानकीकर (Kavita Mankikar) यांना विशेष सीबीआय (CBI) न्यायालयानं सोमवारी जामीन मंजूर केलाय. मानकीकर यांचा जामीन अर्ज 1 जून 2018 पासून प्रलंबित होता.

यामध्ये महिला असूनही रात्री 8 वाजल्यानंतर त्यांना अटक केल्यानं मुंबई उच्च न्यायालयानं काही वर्षांपूर्वी कविता मानकीकर यांची अटक बेकायदेशीर ठरवली होती. परंतु त्यांना आवश्यक त्या कायदेशीर प्रक्रियेचा अवलंब करून पुन्हा अटक करण्याची मुभा सीबीआयला दिली होती. पण सीबीआयनं त्यांना पुन्हा कधीही अटक केली नाही.

पुढे 2018 मध्ये मानकीकर यांनी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष न्यायालयात नियमित जामीनासाठी अर्ज केला, मात्र तो तसाचं प्रलंबित राहिला. त्यावर आता पाच वर्षांनी निकाल देण्यात आलाय. याप्रकरणी आपल्याला अद्याप अटक केलेली नसून आपण खटल्याच्या सुनावणीसाठी नियमित कोर्टात उपस्थित राहत असल्याचा दावाही मानकीकर यांनी जामीन अर्जात केला होता.

विशेष सीबीआय न्यायालयाचे न्यायाधीश एस. एम. मेंजोगे यांनी त्यांची जामीनाची मागणी मान्य केली आहे. मानकीकर यांचा जामीन अर्ज जून 2018 पासून प्रलंबित असून त्यांच्यावर आरोपपत्रही दाखल झालंय. मानकीकर यांच्या अर्जावर सीबीआयनं प्रत्युत्तर दाखल केलं. त्यानंतर बराच अवधी उलटूनही मुंबई उच्च न्यायालयानं मानकीकर यांची अटक बेकायदा ठरवताना त्यांना आवश्यक त्या कायदेशीर प्रक्रियेनंतर अटक करण्याची मुभा सीबीआयला दिली होती. मात्र त्यांना पुन्हा अटक केली नाही.

मानकीकर या नियमित सुनावणीला उपस्थित असतात. त्यामुळं प्रकरणाच्या या टप्प्यावर त्यांचा जामिनासाठीचा अर्ज फेटाळता येणार नसल्याचं न्यायालयानं नमूद केलं. त्यामुळं न्यायालयानं कविता मानकीकर यांना अखेर नियमित जामीन मंजूर केलाय.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube