जगातील पहिली सापाचं विष शोधणारी किट विकसित; डॉ. शाम भट यांच्या प्रयत्नांना यश

एक साधी पट्टी, रक्ताचा एक थेंब फक्त 2 मिनिटांत या प्रश्नाचं उत्तर देऊ शकते. डॉ. शमा भट यांनी जगातील पहिले सापाचे विष शोधणारे किट तयार केले

  • Written By: Published:
Untitled Design (88)

Dr. Shama Bhatt’s leadership power Anvenom kit developed : जेव्हा सर्पदंश होतो तेव्हा प्रत्येक मिनिट महत्वाचा असतो. अनेकदा सर्पदंश(Snake bite) झाल्यावर भीती वाटते. मनात नानाविध प्रश्न कल्लोळ माजवतात. सर्पदंश झालाय, मात्र साप विषारी होता की बिनविषारी? याचा लवकर अंदाज आला नाही तर एखाद्याचा जीव देखील जाऊ शकतो. आता याची भीती उरलेली नाही. कारण एक साधी पट्टी आणि रक्ताचा एक थेंब फक्त दोन मिनिटांत या प्रश्नाचं उत्तर देऊ शकते. भट बायोटेकच्या(Bhat Biotech) डॉ. शमा भट(Dr. Shama Bhat) यांनी जगातील पहिले जलद सापाचे विष शोधणारे किट(Anvenom kit) तयार केले आहे, जे रक्ताच्या थेंबातून फक्त दोन मिनिटांत निकाल देते. 100% अचूकता आणि औषध नियंत्रण मंजुरीसह, ते आशा कामगार, प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि रुग्णवाहिकांना पुरवले जाईल जेणेकरून विलंब आणि अनावश्यक अँटीव्हेनम वापर टाळता येईल. डॉ. शाम भट यांच्या नेतृत्वाखाली विकसित केलेल्या या किटला बनवण्यासाठी वर्षानुवर्षे संशोधन करावे लागले.

मुख्यमंत्र्यांनी नवीन खातं निर्माण करावं, ते म्हणजे पांघरून खातं; भ्रष्टाचारावरून उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्र्यांना चिमटा

मूळचे कासरगोड येथील डॉ. भट यांना जैवतंत्रज्ञानात 35 वर्षांहून अधिक अनुभव असून त्यांनी भारताला गर्भधारणा आणि डेंग्यू चाचण्यांसह अनेक आवश्यक निदान किटची ओळख करून दिली आहे. नेमकी ही किट कशी काम करते? पट्टीवर रक्ताचे दोन थेंब ठेवले जातात. दोन ओळी म्हणजे विष शोधले जाते, एका ओळीचा अर्थ विष नाही. जलद, स्वच्छ आणि अनावश्यक अँटी-व्हेनम ही किट टाळते. त्यांच्या या शोधाचा उपयोग मुख्यत्वे करून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात होणार आहे. शेतात रात्री अपरात्री काम करत असताना अंधारात त्यांना सर्पदंश होत असतो. बऱ्याच शेतकऱ्यांचा आतापर्यंत सर्पदंशामुळे मृत्यू झाला आहे. त्यांच्यासाठी ही किट नक्कीच लाईफ सेव्हरच काम करेल.

follow us