Video : राहुल अन् अखिलेशचे ‘वार वर वार’; तेव्हा सभागृहात उभा ठाकला मोदींचा ‘हनुमान’

  • Written By: Published:
Video : राहुल अन् अखिलेशचे ‘वार वर वार’; तेव्हा सभागृहात उभा ठाकला मोदींचा ‘हनुमान’

नवी दिल्ली : लोकसभेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षांवर विरोधीपक्ष नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि सपा नेते अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांनी ओम बिर्ला यांचे अभिनंदन करताना टोमणेदेखील लगावले. या दोन्ही नेत्यांसह संपूर्ण विरोधीपक्षाला मोदींचा हनुमान म्हणून परिचित असेलेल्या चिराग पासवान यांनी नाव न घेता जोरदार प्रत्युत्तर दिले. सध्या चिराग पासवान यांचा सभागृहातील हा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. सत्ताधाऱ्यांकडून चांगल्या वर्तनाची विरोधी पक्ष अपेक्षा करत असेल, तर तुम्हालाही अशीच वागणूक दाखवावी लागेल, असा टोलाही चिराग पासवान (Chirag Paswan) यानी लगावला. ते सलग दुसऱ्यांदा लोकसभा अध्यक्षपदी विराजमान झाल्याबद्दल ओम बिर्ला यांचे अभिनंदन करताना बोलत होते. (Chhirag Paswan Targets Rahul Gandhi & Akhilesh Yadav In Loksabha)

निलेश लंके खासदार आता पारनेरचा आमदार कोण?; मविआ अन् महायुतीचं गणित काय..

चिराग म्हणाले की, ज्या पद्धतीने तुम्हाला ही जबाबदारी पुन्हा मिळाली आहे, त्याचे आम्ही सर्वजण स्वागत करतो. 17 व्या लोकसभेत तुम्ही ज्या प्रकारे महिला, तरुण आणि पहिल्यांदा खासदार झालेल्यांना प्रोत्साहन दिले. त्याचपद्धतीने तुम्ही माझ्या पक्षाच्या महिला आणि तरुण खासदारांना संधी द्याल अशी आशा आहे. गेल्या पाच वर्षात तुम्ही जे काही निर्णय घेतले ते संविधानाची प्रतिष्ठा वाढवण्याचे काम केले आणि लोकशाहीला अधिक बळकट केल्याचे ते म्हणाले. माझे वडील रामविलास पासवान यांचा आदर्श घेऊन पुढे जाण्यासाठी आमचा पक्ष काम करत असल्याचेही चिराग यांनी यावेळी सांगितले.

काय म्हणाले होते राहुल आणि अखिलेश यादव ?

ओम बिर्ला यांचे अभिनंदन करताना राहुल गांधी म्हणाले होते की, संसदेत सत्ताधारी पक्षासोबतच विरोधकांची भूमिकाही खूप महत्त्वाची असते. विरोधी पक्ष हा जनतेचा आवाज असून विरोधकांनाही आपले मत मांडण्याची संधी मिळाली पाहिजे, तरच लोकशाही मजबूत राहील. विरोधकांना सरकारला सहकार्य करायचे आहे, पण सरकारलाही विरोधकांचे ऐकावे लागेल असे राहुल गांधींनी बिर्ला यांचे अभिनंदन करताना सुनावले होते. तर, सपा नेते अखिलेश यादव यांनी बिर्ला यांचे अभिनंदन करताना तुम्ही ज्या पदावर विराजमान झाला आहात त्याच्या अनेक गौरवशाली परंपरा असून, तुम्ही निष्पक्ष राहून प्रत्येक खासदाराचे म्हणणे ऐकून घ्याल अशी आशा असल्याचे म्हटले होते तसेच तुमचा जसा विरोधकांवर अंकुश असतो तसाच अंकुश सत्ताधाऱ्यांवरही राहिल असे अखिलेश यांना म्हटले होते. त्यामुळे उत्तर प्रदेशमधील दोन्ही नेत्यांनी मोदींसह सत्ताधाऱ्यांना धारेवर धरण्याचा प्रयत्न केला.

राहुल गांधी अन् अखिलेश यादवचे वार अन् चिगार पासवान मैदानात

एकीकडे ओम बिर्ला यांची अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सभागृहातील नेते त्यांचे अभिनंदन करत होते तर, राहुल गांधी आणि अखिलेश यादव बिर्ला यांचे अभिनंदन करत त्याच्या आडून सत्ताधाऱ्यांना टोमणे लगावत होते. या टोमण्यांना मोदींचा हनुमान म्हणून परिचित असलेल्या चिराग पासवान यांनी मैदानात उतरत जोरदार प्रत्युत्तर दिले. चिराग पासवान म्हणाले की, आज मी येथे लोकसभा अध्यक्षांचे अभिनंदन करण्यासाठी उभा राहिलो आहे. पण, अनेक वेळा विरोधी पक्षाकडून अनेक गोष्टी बोलल्या जातात. त्या बघात मी एकच सांगेल की, ज्यावेळी तुम्ही कुणा दुसऱ्याकडे बोट दाखवता तेव्हा बाकीची बोटे तुमच्याकडे असतात. जेव्हा तुम्ही सत्ताधारी पक्षाकडून विशिष्ट आचरणाची अपेक्षा करता, तेव्हा सत्ताधारीही तुमच्याकडूनही तशाच आचरणाची अपेक्षा करत असतं. तुम्ही जेव्हा अध्यक्ष आणि उपाध्यक्षांबद्दल बोलता तेव्हा हे लक्षात असू द्या की, देशातील अनेक राज्यांमध्ये ही दोन्ही पदे विरोधीपत्रचं संभाळत आहे. त्यामुळे या परिस्थितीत पुढील पाच वर्षेही तुमचे नेतृत्व आणि मार्गदर्शन असेच मिळत राहिल असे चिराग यांनी बिर्ला यांचे अभिनंदन करताना म्हटले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज