17 व्या लोकसभेत तुम्ही ज्या प्रकारे महिला, तरुण आणि पहिल्यांदा खासदार झालेल्यांना प्रोत्साहन दिले. त्याचपद्धतीने तुम्ही माझ्या पक्षाच्या महिला आणि तरुण खासदारांना संधी द्याल अशी आशा आहे.
पीएम मोदींनी लोकसभा अध्यक्षपदासाठी ओम बिर्ला यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला होता.
Parliament special session लोकसभा निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर आज (दि.24) नरेंद्र मोदींसह 280 खासदारांनी शपथ घेतली.
18 व्या लोकसभेचे पहिले अधिवेशन आजपासून सुरू झाले असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी, राजनाथ सिंह, अमित शहा, नितीन गडकरी, शिवराज चौहान, मनोहर लाल खट्टर आदींसह शपथ घेतली.
महत्त्वाच्या दिवशी मी सर्व नवनिर्वाचित खासदारांचे मनापासून स्वागत करतो आणि त्यांचे अभिनंदन करतो.
नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी, लोकसभा अध्यक्षांची निवड, राष्ट्रपतींचे अभिभाषण आदींवर चर्चा होणार आहे.