तरुण खासदारांना प्रेरणा मिळेल तर, राहुल म्हणाले विरोधकांनाही बोलू द्या; सभागृहात कोण काय म्हणालं?

  • Written By: Published:
तरुण खासदारांना प्रेरणा मिळेल तर, राहुल म्हणाले विरोधकांनाही बोलू द्या; सभागृहात कोण काय म्हणालं?

नवी दिल्ली : ओम बिर्ला यांची आवाजी मतदानाने लोकसभेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. पीएम मोदींनी लोकसभा अध्यक्षपदासाठी ओम बिर्ला (OM Birla) यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला होता. एनडीएच्या खासदारांनी आवाजी मतदानाने याला पाठिंबा दिला. बिर्ला यांच्या निवडीनंतर मोदींनी (PM Modi) सभागृहाला संबोधित केले. यावेळी मोदींनी बिर्ला यांच्या कार्यकाळात झालेल्या निर्णयांचा पाढा वाचत त्यांच्यावर स्तुतिसुमने उधळली. तुमचे गोड हास्य संपूर्ण सभागृहाला आनंदित करते असे मोदींनी बिर्लांचे कैतुक करतना सांगितले. मोदींशिवाय विरोधी पक्ष नेते राहुल गांधी आणि अखिलेस यादव यांनीदेखील ओम बिर्ला यांचे अभिनंदन केले. (Your Sweet Smile Keeps Entire House Happy PM Modi To OM Birla)

काय म्हणाले मोदी?

तुमचा मागील कार्यकाळ हा संसदीय लोकशाहीचा ऐतिहासिक काळ होता. तुमच्या अध्यक्षतेखाली सभागृहात केलेले काम हा तुमचा तसेच सभागृहाचा वारसा आहे. देशाला दिशा देण्यात तुमच्या लोकसभा अध्यक्षपदाचा मोठा वाटा आहे. तुमच्या अध्यक्षतेखाली, महिला शक्ती, जम्मू आणि काश्मीर पुनर्रचना, डिजिटल वैयक्तिक डेटा संरक्षण विधेयक, मुस्लिम महिला विवाह हक्क कायदा, प्रत्यक्ष कर यासह सामाजिक-आर्थिक आणि नागरी कायदे मंजूर केले गेले. जे काम स्वातंत्र्याच्या 70 वर्षात झाले नाही ते तुमच्या अध्यक्षतेखाली झाल्याचे मोदी म्हणाले. आज देश आपल्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असून, मला विश्वास आहे की, नवीन संसद भवन अमृतकालचे भविष्य लिहिण्यास देखील मदत करेल.

संसदेच्या नवीन इमारतीत आमचा प्रवेश तुमच्या अध्यक्षतेखाली झाला. संसदेचे कामकाज प्रभावी आणि जबाबदारीने करण्यासाठी तुम्ही अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. लोकसभेत आम्ही पेपरलेस आणि डिजिटल प्रणालीद्वारे काम करत आहोत. पहिल्यांदा तुम्ही सर्व खासदारांसाठी ब्रीफिंगची व्यवस्था केली होती, त्यामुळे संसदेत चर्चा चांगली झाली. खासदार म्हणून तुम्ही ज्या पद्धतीने काम करता ते देखील जाणून घेण्यासारखे आणि बरेच काही शिकण्यासारखे आहे. आमच्या सर्वांना विश्वास आहे की, येत्या 5 वर्षात तुम्ही आम्हा सर्वांना मार्गदर्शन कराल.

आपल्या धर्मग्रंथात असे म्हटले आहे की, नम्र आणि नीट वागणारा माणूस यशस्वी मानला जातो. दुसऱ्यांदा सभापतीपदाची जबाबदारी स्वीकारताना, नवे विक्रम केले जातील असा विश्नास मोदींनी व्यक्त केला. बलराम जाखड़ हे पहिले सभापती होते ज्यांनी 5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करून पुन्हा सभापती होण्याची संधी मिळाली. त्यांच्यानंतर तुम्ही आहात, ज्यांना 5 वर्षे पूर्ण करून पुन्हा या पदावर काम करण्याची संधी मिळाली आहे. तुमची कार्यशैली तरुण खासदारांना प्रेरणा देईल याची आम्हाला खात्री आहे असेही मोदी म्हणाले. तुम्हाला माझ्याकडून आणि या संपूर्ण सभागृहाच्या अनेक शुभेच्छा. दुसऱ्यांदा या पदावर विराजमान होणे ही तुमच्यावर मोठी जबाबदारी आहे. अमृतकालच्या या महत्त्वाच्या काळात म्हणजेच येत्या 5 वर्षात तुम्ही आम्हा सर्वांना मार्गदर्शन कराल असा विश्वास आहे.

राहुल गांधी म्हणाले आम्हालाही बोलण्याची संधी द्या

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी लोकसभेच्या अध्यक्षपदी बिर्ला यांची निवड झाल्यानंतर त्यांचे अभिनंदन केले. ते म्हणाले की, विरोधी पक्ष हा भारताचा आवाज असून, मला आशा आहे की तुम्ही आम्हालाही बोलण्याची संधी द्याल. विरोधकांचा आवाज दाबणे हे अलोकतांत्रिक असून, आमचा आवाज गप्प ठेवून संसद चालवता येत नाही. विरोधकांना सरकारला सहकार्य करायचे आहे. त्यामुळे आम्हालाही बोलण्याची संधी मिळेल अशी आशा आहे.

विरोधकांवर अंकुश आहेच पण…

समाजवादी पक्षाचे प्रमुख आणि खासदार अखिलेश यादव यांनीदेखील ओम बिर्ला यांचे लोकसभा अध्यक्ष झाल्याबद्दल अभिनंदन केले. यावेळी त्यांनी या पदाशी अनेक गौरवशाली परंपरा निगडीत असून, भेदभाव न करता सभागृह पुढे जाईल, असा विश्वास व्यक्त केला. सभापती या नात्याने तुम्ही प्रत्येक खासदार आणि पक्षाला समान संधी द्याल. कोणत्याही लोकप्रतिनिधीचा आवाज दाबला जाऊ नये किंवा हकालपट्टीसारख्या कोणत्याही कृतीमुळे सभागृहाच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचू नये, हीच आमची अपेक्षा आहे. ज्याप्रमाणे तुमचा विरोधकांवर अंकुश असतो तसाच अंकुश सत्ताधाऱ्यांवरही असावा असे यादव म्हणाले.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज