भाजपलाच झटका देणार मोदींचा हनुमान; बिहारमध्ये केली ‘ही’ मोठी घोषणा
Chirag Paswan : बिहारमध्ये राजकीय पक्षांनी लोकसभा निवडणुकांची जोरदार तयारी सुरू केली आहे. बिहारमध्ये (Bihar Politics) नितीशकुमार (Nitish Kumar) यांनी राजदला सोबत घेत भाजपला (BJP) झटका दिल्यापासून भाजपचे ग्रह फिरले आहेत. आताही भाजपची डोकेदुखी वाढविणारी बातमी आली आहे. आतापर्यंत भाजपला साथ देत मोदींचा हनुमान म्हणून मिरवणारे लोक जनशक्ती पक्षाचे (रामविलास) चिराग पासवान भाजपला जोरदार धक्का देण्याच्या तयारीत आहेत.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी राज्यातील लोकसभेच्या सर्व 40 जागा लढविण्याचे संकेत दिल्यानंतर चिराग पासवान यांनीही सर्व जागा लढविणार असल्याचा इशारा दिला आहे.
Karnataka Election : गुजरातच्या फॉर्म्युल्याची भाजप विशेष सुपर ५० टीम उतरवणार
चिराग पासवान काल प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी पार्टी राज्यातील सर्व जागांवर उमेदवार उभे करण्याचा विचार करत असल्याचे सांगितले. ते म्हणाले, आमचाही पक्ष विस्तार करत आहे. आम्ही सुद्धा राज्यातील सर्व 40 जागांवर निवडणूक लढण्यासाठी तयारी करत आहोत. राज्यात पक्ष विस्तार करण्याच्या उद्देशाने दौरा केला जात आहे.
लोकजनशक्ति पार्टी (रामविलास) बिहारमधील प्रत्येक लोकसभा मतदारसंघात अस्तित्वात आहे आणि येथे कामही करत आहे. लोकसभा निवडणुकीत त्यांच्या काकाच्या पक्षाबरोबर आघाडी करणार का, असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले, की या जन्मात तरी हे शक्य नाही.
सध्या चिराग पासवान, पशुपति कुमार पारस आणि उपेंद्र कुशवाहा उघडपणे भाजपाचे समर्थन करत आहेत. असे म्हटले जात आहे की 2024 च्या निवडणुकीत भाजप त्यांच्याबरोबर आघाडी करील. मात्र, दोन दिवसांपूर्वी अमित शहा यांनी केलेल्या वक्तव्यामुळे तीन्ही नेत्यांना जोरदार झटका बसल्याचे बोलले जात आहे.
Karnataka Election : गुजरातच्या फॉर्म्युल्याची भाजप विशेष सुपर ५० टीम उतरवणार
अमित शहा यांनी नवादा येथे जाहीर सभेत भाजप बिहारमधील सर्व 40 जागांवर स्वबळावर उतरेल असे वक्तव्य केले होते. त्यानंतर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
अजून लोकसभा निवडणुकांना वेळ आहे. त्यामुळे भाजप खरेच स्वबळावर लढणार की आघाडी करणार हे ही निश्चित नाही. अशा परिस्थितीत अमित शहा यांनी असे वक्तव्य करून चांगलीच खळबळ उडवून दिली आहे.