Karnataka Election : गुजरातच्या फॉर्म्युल्याची भाजप विशेष सुपर ५० टीम उतरवणार

Karnataka Election : गुजरातच्या फॉर्म्युल्याची भाजप विशेष सुपर ५० टीम उतरवणार

Karnataka Election : कर्नाटक विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी भाजप कर्नाटक राज्यात ५० खास नेत्यांची टीम उतरवणार आहे. देशातील विविध राज्यातील अशा नेत्यांचा समावेश करून ही टीम तयार करण्यात आली आहे. जे कोणत्या ना कोणत्या प्रकारे कर्नाटकच्या मतदारांशी संबंधित आहेत आणि त्यांना पक्षाशी जोडू शकतात. या टीममध्ये केंद्रीय मंत्री, मंत्री आणि भाजपशासित राज्यातील आमदार आणि पक्ष संघटनेच्या नेत्यांचा समावेश आहे. संघात सर्वाधिक नेते उत्तर प्रदेशातील आहेत. याशिवाय राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात आणि दिल्लीच्या नेत्यांना संघात स्थान देण्यात आले आहे.

भाजपच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या टीममधील सर्व सदस्यांना कर्नाटकच्या दोन ते तीन विधानसभांची जबाबदारी दिली जाईल. या नेत्यांकडे राज्यातील २२४ विधानसभेतील ११२ विधानसभा जागांपैकी जवळपास निम्म्या जागा असतील, ज्यामध्ये त्यांना चांगली कामगिरी करण्यास सांगण्यात आले आहे.

यापूर्वी गुजरात विधानसभा निवडणुकीत पक्षाने हा फॉर्म्युला स्वीकारला होता. अशाच एका संघाची जबाबदारी राज्यातील दोन ते तीन विधानसभांवर देऊन पक्षाला विजयी करण्याची जबाबदारी दिली. पक्षाचा हा फॉर्म्युला यशस्वी ठरला आणि विक्रमी १५६ जागा जिंकल्या आहेत.

Nitin Gadakari : ‘अंधेरी रात मै दिया मेरे हात में, असे राहुल गांधी यांचे झाले’ – Letsupp

भाजपच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या टीममधील सर्व सदस्यांना कर्नाटकच्या दोन ते तीन विधानसभांची जबाबदारी दिली जाणार आहे. राज्यातील २२४ विधानसभेत जवळपास निम्म्या म्हणजे ११२ विधानसभा जागांची जबाबदारी या नेत्यांवर असेल, ज्यामध्ये त्यांना अधिक चांगली कामगिरी करण्यास सांगण्यात आले आहे. हे असे विधानसभा मतदारसंघ आहेत ज्यात गेल्या निवडणुकीत भाजप दुसर्‍या क्रमांकावर होता, पण थोडक्या मतांनी निवडणूक हरला होता.

गुजरातमध्ये भाजपला अत्यंत कमकुवत विरोधकांचा सामना करावा लागला. पण कर्नाटकात मात्र याच्या उलट परिस्थिती आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीतही भाजप बहुमतासाठी कमी पडला होता. पुढे चलाखीने सरकार स्थापन करण्यात ते यशस्वी ठरले. यावेळीही कर्नाटकात काँग्रेसचे कडवे आव्हान आहे. मल्लिकार्जुन खर्गे काँग्रेसचे अध्यक्ष बनल्याने पक्षाला आणखी बळ मिळाले आहे. त्यामुळे राज्यातील विजयाचा मार्ग भाजपसाठी सोपा नाही.

(13) Devendra Fadanvis | ‘काय होतास तू काय झालास तू…’LetsUpp Marathi – YouTube

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube