“चहावाला टू चीन..” मणिशंकर अय्यरांचे सेल्फ गोल अन् काँग्रेस क्लीन बोल्ड
Mani Shankar Aiyar : लोकसभा निवडणुकीत सातव्या आणि शेवटच्या टप्प्यातील (Lok Sabha Elections) मतदान 1 जूनला होणार आहे. या निवडणुकीत केंद्रातील सत्ताधारी भाजप आणि इंडिया आघाडीच्या नेत्यांनी धुवाधार प्रचार केला. अनेक मुद्द्यांवर एकमेकांना घेरले. आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या. या सगळ्या कल्लोळात मात्र दोन्हीकडच्या नेत्यांनी काही सेल्फ गोल केले. फक्त निवडणूक प्रचारात नाही तर या निवडणुकीच्या मैदानाबाहेरील नेत्यांनी अशी काही वक्तव्ये केली ज्यामुळे पक्षाची मोठी पंचाईत झाली.
यामध्ये काँग्रेस नेते आघाडीवर होते. सॅम पित्रोदा आणि त्यानंतर मणिशंकर अय्यर. या दोन नेत्यांनी अशी काही वक्तव्ये केली ज्यामुळे काँग्रेसची फसगत झाली. इतकेच काय तर अय्यर यांच्या अलीकडील एका वक्तव्यामुळे त्यांना चक्क माफी मागावी लागली. अय्यर यांनी 1962 मधील चीनच्या भारतावरील आक्रमणाबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यावर भाजप नेत्यांनी टीकेची झोड उठवली. अय्यर यांच्या या वक्तव्यावर काँग्रेसने नेहमीप्रमाणे हात झटकण्याचे काम केले आहे. तर अय्यर यांनी या वक्तव्याबद्दल माफी मागितली. तसं पाहिलं तर अय्यर यांनी वादग्रस्त वक्तव्य करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही.
‘राम मंदिर’ ‘वारसा कर’ अन् ‘चायनीज-आफ्रिकन’ पित्रोदांचा ‘इतिहास’ही काँग्रेसला घायाळ करणाराच..
पाकिस्तानकडे अणुबॉम्ब
मणिशंकर अय्यर यांचं पाकिस्तान प्रेम तसं जुनंच आहे. याआधीच्या त्यांच्या वक्तव्यावरून हे दिसलंही आहे. पण अय्यर यांनी काही दिवसांपूर्वी पाकिस्तानचे समर्थन करणारे एक वक्तव्य केले होते. ते म्हणाले होते की पाकिस्तान एक लोकतांत्रिक देश आहे. म्हणून भारताने पाकिस्तानचा सन्मान करायला हवा. पाकिस्तानकडे अणुबॉम्ब आहे. जर आपण त्यांना आदर दिला नाही. त्यांच्याशी संवाद केला नाही तर भविष्यात तेथे कुणी माथेफिरू सत्तेवर आला आणि त्याने अणुबॉम्ब वापरला तर काय करणार..
Loksabha Election मध्ये ईव्हीएममधील छेडछाड कशी ओळखायची? कपिल सिब्बलांचा व्हिडीओ नक्की पाहा…
त्यांच्या या वक्तव्यावर भाजप नेत्यांनी टीकेची झोड उठवली. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रचार सभेत हा मुद्दा चांगलाच उचलून धरला होता. काँग्रेसवर जोरदार टीका केली होती. या वक्तव्यावर नंतर अय्यर यांनी स्पष्टीकरण दिले होते. तरी देखील भाजप नेत्यांनी निवडणूक प्रचारात त्यांच्या या वक्तव्यावर टीका करणे सोडले नाही. या वक्तव्याचा निवडणूक प्रचारात काँग्रेसला बराच त्रास झाला.
प्रभू श्रीरामांबाबतही वादग्रस्त वक्तव्य
मणिशंकर अय्यर यांनी प्रभू श्रीराम यांच्या बाबतीतही असेच वादग्रस्त वक्तव्य केले होते. ते म्हणाले होते की प्रभू श्रीराम यांच्या जन्म ठिकाणाबाबत निश्चितता नाही. राजा दशरथ यांच्या महालात दहा हजार कक्ष होते मग अशावेळी तुम्ही कसे म्हणू शकता की राम तिथेच जन्मले होते. त्यांच्या या वक्तव्यावर प्रचंड गदारोळ झाला होता.
चहावाल्याचं स्वागत करतो
सन 2014 मधील लोकसभा निवडणुकीत अय्यर यांनी नरेंद्र मोदींवर घणाघाती टीका केली होती. परंतु काँग्रेसचा हा डाव त्यांच्यावरच उलटला. पुढे भाजपने त्यांची ही टीका प्रचार कॅम्पेन म्हणून वापरली. भाजपची ही मोहीम चांगलीच यशस्वी ठरली आणि भाजपला सत्तेपर्यंत घेऊन गेली. AICC च्य एका बैठकीत अय्यर यांना मोदींबाबत विचारण्यात आले होते. त्यावेळी अय्यर यांनी काँग्रेस AICC क्या बैठकीत चहा विक्रीसाठी मोदींचे स्वागत करत आहे. नरेंद्र मोदी त्यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री होते. भाजपकडून त्यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून प्रोजेक्ट केले जात होते. मणिशंकर अय्यर यांनी मी असे वक्तव्य कधीच केले नाही असे म्हटले होते.
‘कथित’ शब्दाचा वाद, काँग्रेसच्या फजितीनंतर अय्यरांचा माफीनामा; नेमकं काय घडलं?
हाफीज साहेब
मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील मास्टरमाईंडला अय्यर यांनी हाफिज साहेब म्हणून संबोधित केले होते. त्यांनी पुढे म्हटले होते की पाकिस्तानात जे प्रेम मिळते त्यापेक्षा कितीतरी जास्त शत्रुत्व भारतात मिळते. त्यांच्या या वक्तव्यावर सुद्धा मोठा गदारोळ झाला होता. या वक्तव्यानंतर काँग्रेसची मोठी अडचण झाली होती.
वाजपेयींनाही केले टार्गेट
मणिशंकर अय्यर यांनी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना सुद्धा सोडले नाही. 1998 मध्ये त्यांनी वाजपेयी यांना नालायक म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्यावर भाजप नेते खवळले होते. वाद वाढत असल्याचे पाहून त्यांनी माफी मागितली होती. आपल्याला हिंदी भाषेतील शब्दांचा अर्थ समजत नाही त्यामुळे चूक झाली असे स्पष्टीकरण त्यांनी दिले होते.
मणिशंकर अय्यर यांनी पाकिस्तानात जाऊन मोदी सरकार पाडण्याचे वक्तव्य केले होते. पाकिस्तानात दिलेल्या एका मुलाखतीत अय्यर म्हणाले होते की भारत आणि पाकिस्तान यांच्यात शांती तेव्हाच येऊ शकेल जेव्हा भारतात मोदी सरकार पडेल असे अतिशय वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतरही काँग्रेसची मोठी अडचण झाली होती.