‘राम मंदिर’, ‘वारसा कर’ अन् ‘चायनीज-आफ्रिकन’; पित्रोदांचा ‘इतिहास’ही काँग्रेसला घायाळ करणाराच..

‘राम मंदिर’, ‘वारसा कर’ अन् ‘चायनीज-आफ्रिकन’; पित्रोदांचा ‘इतिहास’ही काँग्रेसला घायाळ करणाराच..

Sam Pitroda : सॅम पित्रोदा यांनी भारतीयांच्या रंगावरून (Sam Pitroda) अतिशय वादग्रस्त वक्तव्य केले. त्यांच्या या वक्तव्यावर देशभरातून टीकेची झोड उठली आहे. भाजप नेते तर अक्षरशः तुटून पडले आहेत. अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून राज्य पातळीवरील नेत्यांनी पित्रोदा यांच्यावर घणाघाती टीका केली. इतकेच नाही तर त्यांच्या या वक्तव्यामुळे काँग्रेस पक्ष सुद्धा अस्वस्थ झाला. पित्रोदा यांचं वक्तव्य आम्हाला मान्य नाही असे स्पष्टीकरण देत काँग्रेसने डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला. पण थांबा, पित्रोदा यांची काँग्रेसला अडचणीत आणण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी सुद्धा त्यांच्या तोंडातून निघालेल्या शब्द बाणांनी काँग्रेसला घायाळ केले आहे. दरम्यान, या वादग्रस्त वक्तव्यानंतर सॅम पित्रोदा यांनी इंडियन ओव्हरसीज काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. काँग्रेसनेही त्यांचा राजीनामा तत्काळ मंजूर केला.

वारसा कर (संपत्तीचे वाटप)

मागील महिन्यात सॅम पित्रोदा यांनी वारसा कराबाबत मोठे विधान केले होते. ऐन निवडणुकीच्या काळात त्यांनी हे वक्तव्य केल्याने काँग्रेस नेत्यांची मोठी फजिती झाली. पित्रोदा म्हणाले होते की अमेरिकेत वारसा कर लागतो. जर एखाद्या व्यक्तीकडे १०० मिलियन डॉलरची संपत्ती असेल तर त्यातील फक्त ४५ टक्के संपत्ती आपल्या मुलांना देऊ शकतो. बाकीची ५५ टक्के संपत्ती सरकार घेते. हा एक इंटरेस्टिंग कायदा आहे.

सॅम पित्रोदांनी दिला इंडियन ओव्हरजीज कॉंग्रेसचा राजीनामा; जयराम रमेश यांची माहिती

तुम्ही कष्ट करून जी संपत्ती कमावली पण त्यातील काही संपत्ती जनतेसाठी सोडावी लागेल. हा जो निष्पक्ष कायदा आहे तो मला चांगला वाटतो. त्यांच्या या वक्तव्यावर भाजपने जोरदार टीका केली होती. निवडणुकीच्या प्रचारात भाजप नेत्यांना हा मुद्दा हातोहात उचलला. पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा, योगी आदित्यनाथ, भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासह अन्य नेत्यांनी काँग्रेसवर जोरदार प्रहार केले.

राम मंदिर

मागील वर्षातील जून महिन्यात सॅम पित्रोदा यांनी राम मंदिराबाबत वादग्रस्त वक्तव्य (Ayodhya Ram Mandir) केले होते. मंदिर भारतातील बेरोजगारी, चलनवाढ, शिक्षण आणि आरोग्य यांसारख्या मूलभूत मुद्द्यांचे समाधान करू शकणार नाही. बेरोजगारी आणि अर्थव्यवस्था यांसारख्या महत्वाच्या मुद्द्यांकडे दुर्लक्ष करून धार्मिक गोष्टींना प्राधान्य दिले जात आहे, असे वादग्रस्त  वक्तव्य त्यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्याचाही भाजप नेत्यांनी चांगलाच समाचार घेतला होता.

Video : दक्षिणेतील लोक अफ्रिकन तर, पूर्वेतील चायनिज; सॅम पित्रोदा काँग्रेसचा बाजार उठवणार?

बालाकोट एअर स्ट्राइकवर संशय

पुलवामा हल्ल्यावरही पित्रोदा यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. एएनआय वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत पित्रोदा यांनी बालाकोट एअर स्ट्राइकवर प्रश्न उपस्थित केले होते. या हल्ल्यात ठार झालेल्यांच्या संख्येबद्दल अधिक माहिती घ्यावी लागेल असे त्यांनी म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर पीएम मोदी यांनी जोरदार टीका केली होती. विरोधक सैन्याचा सातत्याने अपमान करत आहेत. विरोधकांकडून केल्या जात अशा वक्तव्यांवर जनेतेनेच आवाज उठवावा असे आवाहन त्यांनी देशातील नागरिकांना केले होते.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज