Loksabha Election मध्ये ईव्हीएममधील छेडछाड कशी ओळखायची? कपिल सिब्बलांचा व्हिडीओ नक्की पाहा…
Loksabha Election Kapil Sibbal detect tampering in EVM : सध्या देशभरात 1 जूनला होणाऱ्या लोकसभेच्या ( Loksabha Election ) शेवटच्या टप्प्यातील मतदानानंतर लागणाऱ्या निवडणुकांच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. याच दरम्यान विरोधकांकडून मतदानासाठी वापरण्यात येणाऱ्या ईव्हीएम मशीनच्या ( EVM ) छेडछाडीचा मुद्दा उपस्थित केला जात आहे. यावर राज्यसभेचे खासदार कपिल सिब्बल ( Kapil Sibbal ) यांनी एका व्हिडिओद्वारे एक खास चार्ट बनवत ईव्हीएम मशीनसोबत छेडछाड झाली आहे की, नाही ती कशी ओळखायची? याबाबत सविस्तर माहिती दिली आहे.
Mirzapur Season 3 : ‘मिर्झापूर 3’ मध्ये कोणाची सत्ता? रिलीज डेट विषयी मोठा खुलासा
यावेळी बोलताना सिब्बल म्हणाले की, नेहमाप्रमाणे या निवडणुकीमध्ये देखील ईव्हीएम मशीनमध्ये छेडछाड करण्यात आल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे आपण अशा प्रकारची छेडछाड होऊ नये म्हणून आपण खात्री करून घेऊ. मी म्हणणार नाही की, इव्हीएममध्ये छेडछाड केली जाऊ शकत नाही. कोणत्याही मशीनमध्ये छेडछाड केली जाऊ शकते. मात्र ईव्हीएमच्या बाबतीत बोलायचं झालं तर मतांची संख्या आणि वेळ यातील अंतरावरून या मशीनमध्ये छेडछाड झाली आहे की, नाही हे समजू शकते यासाठी मी काही माहिती गोळा केली. ज्याचा एक चार्ट तयार केला आहे.
— Kapil Sibal (@KapilSibal) May 28, 2024
देशातील लोकसभा निवडणुकीसाठी पार पडलेल्या मतदानानंतर 4 जूनला मतमोजणी आणि निकाल जाहीर होतील. त्यासाठी मी जनता, राजकीय पक्ष तसेच मतमोजणी करणारे एजंट यांनाही माहिती देऊ इच्छितो की, ज्यावेळी ते मतमोजणीसाठी ईव्हीएम मशीन उघडतील त्यावेळी काय करायचं? या चार्टमध्ये कंट्रोल युनिट नंबर, बॅलेट युनिट नंबर आणि व्हीव्हीपॅट आयडी त्यासोबतच तिसऱ्या कॉलममध्ये 4 जून 2024 या तारखेसह संबंधित ईव्हीएम मशीन उघडण्याची वेळ देखील नमूद केलेली असेल. मात्र त्यात जर फरक असेल तर तुम्हाला हे लगेचच कळेल की, हे मशीन या अगोदरच उघडण्यात आलं आहे.
“तीन दिवसांत माफी मागा अन्यथा कारवाईला तयार राहा”; CM शिंदेंची राऊतांना नोटीस
तसेच या चार्टवर तुम्हाला कंट्रोल युनिटचा सिरीयल नंबर लिहावा लागेल. त्यामुळे मतमोजणी करणाऱ्या एजंट्सने दोन गोष्टी लक्षात ठेवाव्या की, रिझल्टच बटन तोपर्यंत दाबू नका जोपर्यंत तुम्हाला दिलेल्या चार्ट वरील सर्व माहिती व्हेरिफाय होत नाही. तसेच चार्टवरील वेळ आणि निकालाची वेळ यामध्ये काही फरक असेल तर मतमोजणीच्या वेळी उपस्थित असलेले राजकीय पक्षांचे प्रतिनिधी आणि इतर उमेदवार यांनी चार्ट काळजीपूर्वक तपासावा आणि मगच मशीन उघडावं. अशी माहिती कपिल सिब्बल यांनी दिली आहे.