मोठी बातमी : EVM-VVPAT प्रकरणात सर्व याचिका SC ने फेटाळल्या; EVM वरच होणार मतदान
नवी दिल्ली : EVM-VVPAT प्रकरणात राखून ठेवलेला निर्णय अखेर सर्वोच्च न्यायालयाने आज (दि.26) जाहीर करण्यात आला आहे. हा निकाल देताना न्यायालयाने विरोधकांना मोठा धक्का दिला असून, याचिकार्त्यांच्या सर्व मागण्या फेटाळून लावण्यात आल्या आहेत. मतदारांचा ईव्हीएमवरील विश्वास टिकवून ठेवण्यासाठी, त्यातील मतांची 100 टक्के मोजणी आणि व्हीव्हीपीएटी स्लिप्सवर केली जावी अशी मागणी याचिकार्त्यांनी केली होती. मात्र असे करणे शक्य नसल्याचे सांगत न्यायालयाने बॅलेट पेपरद्वारे निवडणुका घेण्यासह सर्व मागण्या फेटाळून लावल्या आहेत.निकाल जाहीर झाल्यापासून ७ दिवसांच्या आत उमेदवार पुन्हा पडताळणीची मागणी करू शकतो, असे न्यायालयाने म्हटले आहे. Supreme Court rejects pleas for complete EVM-VVPAT verification.
#BREAKING #SupremeCourt rejects pleas for paper ballot voting, complete EVM-VVPAT verification and physical deposit of VVPAT slips.#EVMVVPAT #LokSabhaElections2024📷 #SupremeCourt
— Live Law (@LiveLawIndia) April 26, 2024
गेल्या सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती दीपंकर दत्ता यांच्या खंडपीठाने व्हीव्हीपीएटीसह ईव्हीएमद्वारे पडलेल्या मतांची पडताळणी करण्याची विनंती करणाऱ्या याचिकांवर आपला निर्णय राखून ठेवला होता. त्यावर अखेर न्यायालयाने निर्णय दिला असून, बॅलेट पेपरबाबतच्या सर्व याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या आहेत. त्यामुळे EVM मशिनवरतीच निवडणुका होणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.
अजितदादा ‘कचाकचा’ तून सुटले; क्लिनचिट देत EC ने दिले पुन्हा दमदार भाषणासाठी बळ
निवडणूक प्रकियेत पावित्र्य राखण्याचे दिले होते निर्देश
निवडणूक प्रक्रियेत शुद्धता असणे आवश्यक असल्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने (दि18) रोजी पार पडलेल्या सुनावणीवेळी ECI ला दिले होते. तसेच स्वतंत्र आणि निष्पक्ष निवडणुका सुनिश्चित करण्यासाठी कोणती पावले उचलली याचा तपशीलवार खुलासा करण्यासही आयोगाला न्यायालयाला सांगितले होते. सुनावणीदरम्यान वकील प्रशांत भूषण यांनी VVPAT मशिनमध्ये पारदर्शकता आणण्याची मागणी केली. तर, आता होणाऱ्या निवडणुका निष्पक्षपणे पार पाडण्यासाठी न्यायालयाने काही अंतरिम आदेश द्यावेत तसेच उर्वरित मुद्द्यांवर नंतर सुनावणी घ्यावी अशी मागणी अधिवक्ता संजय हेगडे यांनी न्यायालयाला केली होती. यावेळी न्यायालयात आयोगाकडून VVPAT कसे काम करते याबद्दल माहिती देण्यात आली होती. तसेच ईव्हीएममध्ये छेडछाड करणे शक्य नसल्याचेही सांगितले होते.