EVM मशिनमध्ये घोळ! पराभूत झालेला उमेदवार SC च्या फेर मतमोजणीत विजयी

EVM मशिनमध्ये घोळ! पराभूत झालेला उमेदवार SC च्या फेर मतमोजणीत विजयी

EVM Recounting : सुप्रीम कोर्टाच्या (Supreme Court) न्यायाधिशांसमोर ईव्हीएमशिनमधील (EVM machine) मतांची पुन्हा मोजणी झाली. या मोजणीमध्ये धक्कादायक निकाल समोर आला. पराभूत झालेल्या उमेदवाराला सर्वाधिक मते मिळाल्याचं समोर आलंय. त्यामुळं सुप्रीम कोर्टानं ही निवडणूक (Election) रद्द ठरवली आणि आधी पराभूत मात्र नंतर सर्वाधिक मत मिळालेल्या उमेदवाराला पदभार स्वीकारण्याचे आदेश दिले.

भव्यदिव्य सेटवर चित्रीत होणार रहस्यमय ‘घबाडकुंड’; दिसणार चमत्कारीक गोष्टी 

हरयाणातील पानीपत जिल्ह्यातील बुआना लाखू ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाची निवडणूक २ नोव्हेंबर २०२२ रोजी झाली होती. या निवडणुकीत कुलदीप सिंह यांना निवडणूक आयोगाने विजयी घोषित केले होते. मात्र, पराभूत उमेदवार मोहित कुमार यांनी या निकालाला आव्हान देत ईव्हीएम मतमोजणीत गडबड असल्याचा आरोप केला होता. त्यांनी प्रथम अतिरिक्त सिव्हील न्यायाधीश आणि निवडणूक न्यायाधिकरणाकडे दाद मागितली, पण तिथे यश न मिळाल्याने त्यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली.

दरम्यान, सुप्रीम कोर्टाने ३१ जुलै २०२५ रोजी सर्व मतदान केंद्रांवरील ईव्हीएम मशिन्सची मतमोजणी पुन्हा करण्याचे आदेश दिल होते. ही प्रक्रिया कोर्टाच्या रजिस्ट्रार यांच्या देखरेखीखाली आणि व्हिडिओ रेकॉर्डिंगसह पार पडली. या फेर मतमोजणीत मोहित कुमार यांना १,०५१ मते मिळाली, तर कुलदीप सिंह यांना १,००० मते मिळाली. यामुळे आधी पराभूत घोषित झालेले मोहित कुमार प्रत्यक्षात विजयी ठरले.

आयारामांमुळे संघ परिवार प्रदूषित…; स्वामी गोविंददेव गिरी महाराजांनी टोचले भाजपचे कान 

दरम्यान, सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठाने यानंतर ही निवडणूकच रद्द करत मोहित कुमार यांना विजयी घोषित करण्याचे आदेश उपायुक्तांसह निवडणूक अधिकाऱ्यांना दिले. तसेच तातडीने मोहित कुमार यांच्याकडे सरपंचपदाचा पदभार देण्याच्या सूचना केल्यात.

न्या. सूर्यकांत, न्या. दीपांकर दत्ता आणि न्या. एन. के. सिंह यांच्या खंडपीठाने हा ऐतिहासिक निर्णय दिला. या निकालामुळे ईव्हीएमच्या विश्वासार्हतेवर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर चर्चा सुरू झाली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube