आयारामांमुळे संघ परिवार प्रदूषित…; स्वामी गोविंददेव गिरी महाराजांनी टोचले भाजपचे कान

Swami Govinddev Giri Maharaj : मागील काही वर्षात काँग्रेस (Congress) आणि इतर विरोधी पक्षांमधील अनेक मोठ्या नेत्यांनी भाजपमध्ये (BJP) प्रवेश केला. त्यामुळे भाजपच्या मूळ कार्यकर्त्यांवर आणि पदाधिकाऱ्यांवर अन्याय होत असल्याची कुजबूज कायम सुरू असते. याच आयाराम संस्कृतीवरून आता अयोध्येतील रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी महाराज (Swami Govinddev Giri Maharaj) यांनी भाजपवर सडकून टीका केला.
मास्टर ब्लास्टरच्या घरी लगीनघाई! कोण आहे अर्जुनची होणारी पत्नी? पाहा खास फोटो
ज्या लोकांना यापूर्वी केव्हाही संघ पटला नव्हता, हिंदुत्व पटले नव्हते, अशी लोकांची भाजपमध्ये आयात करण्यात आलीये, त्यामुळं संघ परिवार प्रदूषित झालाय, असं त्यांनी म्हटलं.
पुण्यातील एका पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात बोलताना गोविंददेव गिरी महाराज यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. ते म्हणाले, या शताब्दी वर्षात, पूज्य डॉक्टरांपासून अनेक प्रचारकांची नावे समोर येत आहे. यामुळं डोळे भरून येत आहेत. या लोकांनी जे तप केलं, जो त्याग केला, त्या तपाला आणि त्यागाला न्याय द्यायचा असेल तर देश वाचवण्याची आपली जबाबदारी आहे. यासाठी संघाने सावध राहण्याची गरज आहे, असं मला वाटतं.
पुढं ते म्हणाले, संघाच्या व्यापक झालेल्या कार्यात विविध मार्गाने आयात केलेली मंडळी येतात. त्यांचे संस्कार वेगळे आहेत. ज्या लोकांनी कधीही संघ पटला नाही, हिंदुत्व पटले नाही, त्यांना नैतिकता कशाशी खातात हेच कळत नाही. या लोकांची आयात मोठ्या प्रमाणात झाली आहे. गंगा शुध्दच आहे, पण गंगेत येऊन मिसळणाऱ्या नाल्यामुळं ती प्रदूषित झाली, त्याच प्रमाणे संघ परिवारही आयारामांमुळं प्रदूषित होईल, अशी भीती मला वाटते, असं ते म्हणाले.
लोढा-बिढासारखी माणसं… अन् स्वातंत्र्यदिनीच आहारावर गदा; कबुतरखाना ते मांसविक्री, राज ठाकरे कडाडले
संघालाही तीनदा संपवण्याचा प्रयत्न
ते म्हणाले, प्राचीन काळापासून मध्ययुगीन काळापर्यंत, भारतावर विविध शक्ती आणि परकीयांनी आक्रमण केली. अनेक संकटे आली. मंदिरे उद्ध्वस्त केली. विद्यापीठे उद्ध्वस्त केली गेली. हिंदुत्वावर आघात केला गेला. परंतु संघाने सुनियोजितपणे त्याचा प्रतिकार केला. देशाची संस्कृती आणि आंतरिक सजीवता कायम ठेवली. त्यामुळं भारत देशाला कुणालाही संपवता आले नाही. एवढंच नाही तर स्वत: संघालाही तीनदा संपवण्याचा प्रयत्न झाला. आपल्याला हा वारसा सांभाळून देशाला पुढं न्यायचं आहे, असं ते म्हणाले.