मास्टर ब्लास्टरच्या घरी लगीनघाई! कोण आहे अर्जुनची होणारी पत्नी? पाहा खास फोटो

- भारतीय क्रिकेटचा ‘गॉड ऑफ क्रिकेट’ म्हणजे सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. ही चर्चा त्याच्या खेळाची नाही तर वैयक्तिक आयुष्याबद्दल आहे.
- कारण 13 ऑगस्टला अर्जुनचा एका खाजगी समारंभात साखरपुडा उरकला आहे. सोशल मिडीयावर या लग्नाबाबत पोस्ट शेअर केल्या आहेत.
- आता तुम्हाला प्रश्न पडला असेल ना कधीही चर्चा न झालेल्या नात्यातील अर्जुनची होणार ही पत्नी आणि मास्टर ब्लास्टरची सुनबाई नेमकी कोण आहे. तर जाणून घेऊ…
- अर्जुनची पत्नी सानिया चांडोक ही मुंबईतील प्रतिष्ठित घई कुटुंबातील असून, त्यांचा व्यवसाय हॉटेल, रेस्टॉरंट आणि अन्न उद्योगात पसरलेला आहे.
- त्यांच्या कुटुंबाकडे इंटरकॉन्टिनेंटल मरीन ड्राइव्ह हॉटेल आणि लोकप्रिय ब्रुकलिन क्रीमरी (कमी कॅलरी आइस्क्रीम ब्रँड) यासारख्या व्यवसायांची मालकी आहे.
- सानिया चांडोकने लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून पदवी प्राप्त केली आहे. ती देशातील प्रसिद्ध उद्योगपती रवी घई यांची नात आहे.
- तर दुसरीकडे अर्जुन तेंडुलकर सध्या 25 वर्षांचा असून भारतीय संघात जागा मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे. असं असताना त्याचा साखरपुडा उरकल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.