अबब! सचिनचा लेक अर्जुन ‘इतक्या’ संपत्तीचा मालक; वाचा कुठून कमावतो पैसा?

अबब! सचिनचा लेक अर्जुन ‘इतक्या’ संपत्तीचा मालक; वाचा कुठून कमावतो पैसा?

Arjun Tendulkar Networth : मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरचा (Sachin Tendulkar) मुलगा अर्जुन तेंडुलकर लवकरच (Arjun Tendulkar) लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. मुंबईतील उद्योजक घरातील सानिया चंडोकसोबत (Saaniya Chandok) अर्जुनचा साखरपुडा झाला आहे. अर्जुन तेंडुलकर सुद्धा क्रिकेट खेळाडू (Arjun Tendulkar Wedding) आहे. वडिलांप्रमाणेच क्रिकेट विश्वात नाव कमावण्याचं स्वप्न तो उराशी बाळगून आहे. या तो यशस्वी होतो की नाही याचं उत्तर येणारी वेळ देईलच. पण एका गोष्टीचं उत्तर नक्कीच मिळालंय ते म्हणजे अर्जुन किती श्रीमंत (Arjun Tendulkar Networth) आहे याचं. चला तर मग जाणून घेऊ या..

अर्जुन तेंडुलकरच्या संपत्तीचा विचार केला त्याच्याकडे आजमितीस 21 कोटींची संपत्ती आहे. यातील बरचसं उत्पन्न त्याला क्रिकेटच्या तिन्ही फॉर्मेटमधून मिळतं. अर्जुन सध्या देशांतर्गत क्रिकेटपासून अगदी आयपीएलमध्येही खेळतो. डाव्या हाताने गोलंदाजी करतो. देशांतर्गत क्रिकेटमध्ये तो गोवा संघाचे प्रतिनिधीत्व करतो. सन 2021 पासूनच तो आयपीएलमध्ये मुंबई संघाकडून खेळत आहे. स्पोर्ट्सकीडानुसार अर्जुन तेंडुलकरची एकूण संपत्ती 21 कोटींच्या आसपास आहे.

सचिन-अंजली तेंडुलकर होणार सासू-सासरे; मुलगा अर्जुन तेंडुलकरचा उरकला साखरपुडा

आयपीएलमधून होतो पैशांचा वर्षाव

अर्जुनला अजून तरी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळण्याची संधी मिळालेली नाही. परंतु, गोवा संघाकडून खेळताना त्याने आयपीएलमध्येही सहभागी होणे सुरुच ठेवले होते. मुंबईच्या संघाकडून तो खेळत आहे. रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर 2021 मध्ये आयपीएल लिलावात त्याला 20 लाख रुपयांच्या बेस प्राइसवर खरेदी करण्यात आले होते. यानंतर 2022 पासून आतापर्यंत प्रत्येक वर्षी त्याला 30 लाख रुपयांत रिटेन केले गेले. मागील पाच वर्षांतील आयपीएल स्पर्धांतून अर्जुनने एकूण 1.40 कोटी रुपयांची कमाई केली आहे. त्याचे वार्षिक उत्पन्नातील 80 टक्के या माध्यमातूनच मिळते.

लग्जरी कारचे शानदार कलेक्शन

अर्जुन तेंडुलकरकडे एकापेक्षा एक अशा शानदार कारचे कलेक्शन आहे. त्याचे वडिल सचिन तेंडुलकर यांच्याकडेही एकापेक्षा एक लग्जरी कार आहेत. रिपोर्टनुसाार अर्जुन आणि सचिनकडे किआ कॅरेन्स, पोर्श कायेन, बीएमडब्ल्यू i8, निसान GTR, फेरारी मोडेना, मर्सिडीज एएमजी C36 सह आणखीही महागड्या कार आहेत. त्यामुळे क्रिकेट प्रमाणेच अर्जुन वाहनांच्या क्षेत्रातही आघाडीवर आहे.

सानिया चंडोक कोण

अर्जुनचा साखरपुडा सानिया चंडोक या मुलीशी मुंबईत पार पडला. सानिया मुंबईतील प्रसिद्ध उद्योजक रवी घई यांची नात आहे. एका खासगी कार्यक्रमात साखरपुडा झाला. यात दोन्ही कुटुंबातील सदस्य उपस्थित होते. सानियाच्या कुटुंबाबबद्दल बोलायचं झालं तर हॉटेलपासून आयस्क्रिमपर्यंत त्यांचा व्यवसाय विस्तारला आहे. सर्व बिजनेस ग्रेविस ग्रुपमार्फत संचालित केले जातात.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube