लोढा-बिढासारखी माणसं… अन् स्वातंत्र्यदिनीच आहारावर गदा; कबुतरखाना ते मांसविक्री, राज ठाकरे कडाडले

Raj Thackeray Criticize on pigeons House and Ban on Meat : मुंबईमध्ये कबुतर आणि कबुतरांना दिले जाणारे खाद्य हा वादाचा मुद्दा झाला आहे.सर्वोच्च न्यायालयाकडे दुसऱ्यांदा दिवसाचा ठराविक वेळ कबुतरांना खाद्य देण्याची परवानगी द्यावी, अशीही मागणी करण्यात आली होती. न्यायालयाने तुर्तास कबुतरखान्यांवरील बंदीही कायम ठेवली आहे. दुसरीकडे 15 ऑगस्टच्या दिवशी कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेने मांस विक्रीवर बंदी घातली आहे. त्यात कबुतरखान्यांवरून सरकार आणि मंगलप्रभात लोढा यांच्यावर निशाणा साधला. तर मांसविक्रीवरून राज ठाकरे कडाडल्याचं पाहायला मिळालं.
काय म्हणाले राज ठाकरे?
राज ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी विविध विषयांवर प्रतिक्रिया दिली आहे. त्यात त्यांनी कबुतरखान्यांवरून सरकार आणि मंगलप्रभात लोढा यांच्यावर निशाणा साधला. तर मांसविक्रीवरून देखील राज ठाकरे कडाडल्याचं पाहायला मिळालं. ते म्हणाले की, पहिले तर कबुतरखाना बंदी या उच्च न्यायालयाचा निर्णय आहे. त्याप्रमाणे सर्वांना वागावे लागेल. त्यानंतर दुसरं म्हणजे कबुतरांमुळे विविध आजार होत असल्याचं अनेक डॉक्टरांनी सांगितलं आहे. त्यामुळे न्यायालयाच्या आदेशानंतर देखील कुणी कबुतरांना खायला घालत असेल तर पोलिसांनी त्यावर कारवाई करावी. धर्माच्या नावाखाली कबुतरखान्यांचं समर्थन करणाऱ्यांच्या आंदोलनावरही कारवाई व्हायला हवी होती.लोढा-बिढासारखी माणसं मध्ये येत आहेत. पण ते कोणत्या एका समाजाचे नाही तर राज्याचे मंत्री आहेत. त्यांनी महाराष्ट्र आणि कोर्टाचा मान राखावा.
मोठी बातमी ! जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये ढगफुटी, 10 जणांचा मृत्यू, बचाव कार्य सुरू
त्यानंतर 15 ऑगस्टच्या दिवशी कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेने केलेल्या मांस विक्रीवरील बंदीवरून राज ठाकरे म्हणाले की, मी आमच्या लोकांना सांगितलं आहे की, मांस विक्री सुरू ठेवा. पहिली गोष्ट म्हणजे महानगर पालिकेला हे अधिकार नाही. कुणी काय खावं आणि काय खावू नये हे ठरवण्याचा अधिकार सरकार आणि महानगर पालिकेला नाही. एकीकडे स्वातंत्र्यदिन साजरा करायचा आणि खायचं स्वातंत्र्य नाही. तसेच आपण स्वातंत्र्यदिनीच लोकांचं स्वातंत्र्य हिरावून घेत आहोत. तसेच एका कुणाचा धर्म दुसऱ्या कुणाच्या खान्यावर बंदी आणणारा नसावा.